'दादा, मी प्रेग्नेंट आहे' या पोस्टरची पुण्यात भन्नाट चर्चा

पुण्यात भल्यामोठ्या होर्डिंगवर चक्क ' दादा, मी प्रेग्नेंट आहे ' असं या होर्डिंगवर लिहिलेलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2018 12:33 PM IST

'दादा, मी प्रेग्नेंट आहे' या पोस्टरची पुण्यात भन्नाट चर्चा

अद्वैत मेहता, प्रतिनिधी,

पुणे, 01 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी पुण्यात लागलेल्या एका होर्डिंगची मोठी चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक अजब होर्डिंग सध्या पुण्यात चर्चेचा विषय बनलं आहे.

पुण्यात भल्यामोठ्या होर्डिंगवर चक्क ' दादा, मी प्रेग्नेंट आहे ' असं या होर्डिंगवर लिहिलेलं आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष या होर्डिंगकडे लागलं आहे. त्यामुळे पुण्यात या होर्डिंगची मोठी चर्चा होते आहे.

दरम्यान हे होर्डिंग एका नाटकाचं प्रमोशन असल्याचं सांगितलं जातं आहे. तर दुसरीकडे हे एका नाटकाचं प्रमोशन असल्याचं बोललं जात आहे.

पुण्यात गजबजलेल्या डेक्कन रोडवर हे अजब होर्डिंग  लावण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ‘शिवडे आय एम सॉरी!’ आणि 'सुंदर बायका साडी कुठून खरेदी करतात' या होर्डिंगनी धमाल उडवल्यावर पुण्यात 'दादा मी प्रेग्नन्ट आहे' या होर्डिंगने धमाल उडवली आहे.

Loading...

मात्र, पुण्यातील वर्दळीच्या  खंडूजीबाबा चौकात या होर्डिंगवरून खळबळ माजली आहे. त्यामुळे रातोरात ते हटवण्यात आलं.

तर मागे एकदा पिंपरीतील एका मजनूने प्रेयसीची माफी मागण्यासाठी वेगळा मार्ग निवडला. प्रियकराने पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले होते. हे बॅनर पाहून पोलीसही चक्रावले. तपासानंतर प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने हा प्रताप केल्याचे उघड झाले आणि पोलिसांनीही डोक्याला हात लावला.


VIDEO : छेड काढणाऱ्या युवकाला मुलींनी चपलेनं बड.. बड.. बडवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...