DSK ना दिलासा; Corona मुळे निधन झालेल्या मुलीच्या अंत्यविधीला नाही तरी किमान तेराव्याला जाता येणार

DSK ना दिलासा; Corona मुळे निधन झालेल्या मुलीच्या अंत्यविधीला नाही तरी किमान तेराव्याला जाता येणार

सध्या कारागृहात असणारे पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (DSK) आणि त्यांच्या पत्नीला काही तासांसाठी मुलीच्या तेराव्याला जायची मुभा देण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 11 ऑगस्ट : बांधकाम व्यावसायिक आणि सध्या 2000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या मुलीचा Corona मुळे मृत्यू झाला. डी.एस.के आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह मुलगा शिरीषही सध्या कारागृहात असल्याने अंत्यसंस्काराला कुणी उपस्थित राहू शकलं नाही. आता कोर्टाने या तिघांना मुलीच्या तेराव्यासाठी काही तास घरी जाण्याची परवानगी दिली आहे.

डी.एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना कोविड-19 चा संसर्ग झाला होता. तब्येत ढासळल्याने त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

कोरोनाच्या प्रतिबंधामुळे अंत्यसंस्कारासाठी कारागृहात असणाऱ्या कुलकर्णी कुटुंबीयांतील कुणालाही अश्विनी देशपांडेंच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. आता DSK यांच्या वकिलाने किमान 13 व्याच्या विधीसाठी सूट मिळावी म्हणून कोर्टात अर्ज केला होता.

कोर्टाने त्यांची विनंती मान्य केली आहे. आता 16 ऑगस्टला मुलीच्या तेराव्यासाठी कुलकर्णी दांपत्य आणि मुलगा शिरीष यांना काही तासांसाठी कारागृहातून घरी जायची परवानगी देण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा आदेश दिला.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 11, 2020, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading