पुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी

पुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी

आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जात होते, पण भटारखान्यातून लिकेज झालेला सिलेंडर घेऊन बाहेर पडत असतानाच त्या सिलेंडरचा स्फोट झाला

  • Share this:

पुणे, 04 जुलै: मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास सातारा रस्त्यावर सिटीप्राईड जवळील हॉटेल मैफिलमध्ये आगीची घटना घडली. तेथील भटारखान्यामधे असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला. आगीवर नियंत्रण संपादन करण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी त्वरीत घटनास्थळी पोहोचले. पण आगीवर नियंत्रण मिळवताना तांडेल पदावर असलेले किसन गोगावले (55) आणि जवान चंद्रकांत गावडे जखमी झाले. अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांसह हॉटेलमधील चार कर्मचारी जखमी झाले असून त्यांना राव रुगणालयामध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा: 47 वर्षांनंतर नागपुरात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन!

आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जात होते. यावेळी दलाचे तांडेल किसन गोगावले व जवान चंद्रकांत गावडे यांनी भटारखान्यातून लिकेज झालेला सिलेंडर घेऊन बाहेर पडत असतानाच त्या सिलेंडरचा स्फोट झाला. पण या स्फोटात दोघांनाही आगीची झळ बसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. लिकेज झालेला सिलेंडर जवानांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. आग विझवण्यात दलाच्या अधिकाऱ्यांना यश आले असून, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस घेत आहेत.

हेही वाचा: अखेर १२ तासांनंतर पश्चिम रेल्वे रुळावर!

हेही वाचा: सोशलकल्लोळ : म्हणे,अंधेरी पुल दुर्घटनेत 'धोनी' जखमी?

First published: July 4, 2018, 7:43 AM IST

ताज्या बातम्या