कोरोनाने घरात बसवलं अन् वादळाने घराचं छप्परचं उडालं, डोळ्यांत पाणी आणणारी घटना

कोरोनाने घरात बसवलं अन् वादळाने घराचं छप्परचं उडालं, डोळ्यांत पाणी आणणारी घटना

एकीकडे कोरोनाने तोंडाचा घास नेला आणि दुसरीकडे वादळानं डोक्यावरचं छप्पर नेलं. त्यामुळे या गावकऱ्यांवर मोठं दुहेरी संकट आलं आहे.

  • Share this:

पुणे, 02 मे : कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असताना पुण्याच्या ग्रामीण भागात चक्रीवादळासह पाऊसाचं संकट डोक्यावर उभं राहिलं आहे. या वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पाऊसात खेड तालुक्यातील कोये गावात अनेक घरांवरील छतच उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एकीकडे कोरोनाने तोंडाचा घास नेला आणि दुसरीकडे वादळानं डोक्यावरचं छप्पर नेलं. त्यामुळे या गावकऱ्यांवर मोठं दुहेरी संकट आलं आहे.

कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना खेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक लढत आहे. मात्र, अशात आता या नागरिकांसमोर वादळी वाऱ्यासह पाऊसाचं मोठं संकट उभं राहिलं आहे. काल संध्याकाळपासुन वादळी वाऱ्यासह पाऊसाच्या सरी बरसत आहेत.

लॉकडाऊनमध्ये संतांनी केलं बर्थडे सेलिब्रेशन, पार्टीत होते 9 कोरोना पॉझिटिव्ह

यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास खेड तालुक्यातील कोये गावातील बाळासाहेब गायकवाड राजु गायकवाड दौलत गायकवाड या शेतकऱ्यांच्या घरावरील छत वादळी वाऱ्यात उडालं. त्यामध्ये घरगुती साहित्यासह अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

ऐन पाऊसाच्या तोंडावर वादळामुळे घरावरील छत उडाल्यानं सर्व संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे पुढील काळात रहायचं कुठं? असा प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासकिय पातळीवरुन तातडीने पंचनामाकरुन मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महिला पोलिसाची छेड काढल्याची भयानक शिक्षा, झाडाला हात-पाय बांधून जिवंत जाळलं

एकीकडे लोकांनासमोर आसमानी संकट आहे तर दुसरीकडे मुंबईवरदेखील पुढचे 24 तास धोक्याचे असणार आहेत. कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या मुंबईवर आता चक्रीवादळाचं नवं संकट आलं आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी वादळ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. यावेळी वारे ताशी सुमारे 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. बीएमसी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील राज्य सरकारी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी केली आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र मंगळवारी सकाळपर्यंत तीव्र डिप्रेशनमध्ये बदलेल. यामुळे मुंबईत मंगळवारी रात्री ते बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळाचं गांभीर्य लक्षात घेता हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी हवामान खात्याने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला होता, परंतु सोमवारी तो बदलून रेड करण्यात आला आहे.

कोरोनावरील उपचारासाठी 'हे' औषध धोकादायक, मृतांची संख्या आणखी वाढेल; WHOचा इशारा

First published: June 2, 2020, 12:41 PM IST

ताज्या बातम्या