News18 Lokmat

सायकलिस्ट अजय पडवळचा लेहमध्ये अपघाती मृत्यू

पुण्याहून लेहला जाण्यास निघालेल्या अजयचा अपघातात मृत्यू झाला. आज त्यांचे पार्थिव पुण्यास संध्याकाळी 4.30 वाजता आणलं जाणारे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2017 10:48 AM IST

सायकलिस्ट अजय पडवळचा लेहमध्ये अपघाती मृत्यू

13 जुलै : भारतीय सायकलिंग क्षेत्रावर एकच शोककळा पसरलीय. कारण आघाडीचा सायकलिस्ट अजय पडवळचा लेहमध्ये अपघाती मृत्यू झालाय.

पुण्याहून लेहला जाण्यास निघालेल्या अजयचा अपघातात मृत्यू झाला. आज त्यांचे पार्थिव पुण्यास संध्याकाळी 4.30 वाजता आणलं जाणारे.

1 जुलैपासून 22 वर्षाचा अजय दोन मित्रांसोबत रोड ट्रिपला निघाला होता. कारगिलमधून ते लेहला पोचले. लेहमध्ये खार्दुंगला इथे हा अपघात झाला.

अजय पडवळला स्पोर्टसची आवड होती. त्यानं अनेक वेळा सायकलनं रोड ट्रिप्स केल्यात. दुर्दैवानं ही रोड ट्रिप शेवटची ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 10:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...