Home /News /pune /

पुणेकरांच्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर पाणी, जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला नवीन आदेश

पुणेकरांच्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर पाणी, जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला नवीन आदेश

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

    पुणे, 25 डिसेंबर : नववर्षांच्या स्वागतासाठी (new year celebration) सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यातही (Pune) थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पर्यटनस्थळी रात्र जमावबंदी आदेश जारी केला. शुक्रवार 25 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे. पुणे ,पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रात रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी ग्रामीण भागात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळं एमटीडीसीच्या निवासस्थानांचे आरक्षण केलेल्या पर्यटकांचा मात्र हिरमोड होणार आहे. नववर्षाच्या निमित्ताने mtdc ची सर्व निवासस्थानांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. 31 डिसेंबरला या ठिकाणी सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. मात्र हे कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. धक्कादायक! मासिक पाळीच्या दरम्यान लग्न केलं म्हणून नवऱ्यानं मागितला घटस्फोट तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी या नगरपरिषदांचा भाग,तळेगाव, चाकण midc,हिंजवडी आयटी पार्क तसंच लोणावळा,अॅम्बी व्हॅली, लवासा, भुशी डॅम, मुळशी धरण, ताम्हिणी घाट, सिंहगड रस्ता, खडकवासला या पर्यटनस्थळांसह मावळ, मुळशी आणि हवेली तालुके याशिवाय विविध फार्म हाऊस, निवासस्थाने(रिसॉर्ट्स ) या ठिकाणी रात्र जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरेगाव भीमासह अकरा गावामध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. चिंता वाढणार, महाराष्ट्राच्या वेशीवर ब्रिटन रिटर्न 11 प्रवासी पॉझिटिव्ह 1 जानेवारीला शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायी विजयस्तंभला अभिवादन करण्यासाठी येतात. कोरेगाव भीमाच्या आसपास भागातील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी,वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 सकाळी 6 वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या