रत्नागिरी, 24 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये भरणे नाका इथं एका घरात ८३ जीवंत गावठी बॉम्ब सापडल्यानं खळबळ उडालीय. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. गुरुवारी सायंकाळी खेड पोलिसांनी गावठी बॉम्ब प्रकरणी ही कारवाई केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी या प्रकरणी भादवी कलम 286 सह स्फोटक पदार्थ विषयक कायदा 1908 चे कलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. कल्पेश जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिकारीसाठी सर्रास वापर केले जाणारे जीवघेणे गावठी बॉम्ब एक घरातून खेड पोलिसांनी जप्त केले आहेत.
पुण्यात तरुणांचा धुडगूस, दहशत रहावी म्हणून फोडल्या 14 गाड्या
गेल्या आठवड्यात खेडमधील पन्हाळजे गावात प्रमुख जिल्हा मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसच्या टायर खाली गावठी बॉम्ब फुटला होता. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याद्दष्टीने तपास करत असताना गावठी बॉम्ब मोठ्या संख्येत एक घरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भरणे गावातील त्या घरावर धाड टाकली. तेव्हा 80 हुन अधिक घातक गावठी बॉम्ब पोलिसांना आढळले आहेत. खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime