News18 Lokmat

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांचा धिंगाणा; वाहन तोडफोडीला पुन्हा सुरुवात

मागच्या दोनच दिवसात शहरातील थेरगाव, पिंपरी आणि रामनगर परिसरातील कित्येक वाहनं फोडण्यात आली. मात्र पोलिसांना त्याचं काहीही सोयरसुतक नाही आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2018 09:44 AM IST

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांचा धिंगाणा; वाहन तोडफोडीला पुन्हा सुरुवात

10 जानेवारी : पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांनी अक्षरशः हैदोस घालत पुन्हा एकदा तोडफोडीच सत्र सुरु केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कायद्याचा धाक किती उरलाय हे सांगायलाच नको. उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांचे असे उद्योग सुरु आहेत. पोलीस प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेचा आर्थिक फटका आणि मनस्ताप मात्र सर्वसामान्यांना भोगावा लागतोय.

मागच्या दोनच दिवसात शहरातील थेरगाव, पिंपरी आणि रामनगर परिसरातील कित्येक वाहनं फोडण्यात आली. मात्र पोलिसांना त्याचं काहीही सोयरसुतक नाही आहे. गुन्हेगारांना पकडू, पथकं रवाना झाली आहेत, कठोर कारवाई करु, अशी सरकारी छापाची उत्तरं त्यांच्याकडून दिली जात आहेत.

शहरातल्या मोकाट असलेल्या या गुंडांकडून सध्या सर्वसामान्यांचं मोठं नुकसान केलं जातं आहे. आणि हे शक्य झालंय ते खाकी वर्दीवर स्टार मिरवणाऱ्या शहरातल्या अतिशय कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे. या सर्व घटनांमुळे सामान्य माणसाला कोणीच वाली नसतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2018 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...