Home /News /pune /

Pune : दोघांचे भांडण तिसऱ्याची हत्या, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून सराईत गुन्हेगाराचा खून

Pune : दोघांचे भांडण तिसऱ्याची हत्या, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून सराईत गुन्हेगाराचा खून

murder in pune वाघाटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे त्याच्यावर तडीपारी आणि नंतर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती.

    पुणे, 15 मे : पुण्यात (Pune) व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराचा खून (Murder of criminal) झाला आहे. सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून त्याचा खून (Murder) करण्यात आला. हनुमंत वाघाटे असं मृत गुन्हेगाराचं नाव असून, त्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. वाघाटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे त्याच्यावर तडीपारी आणि नंतर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती. (वाचा-भयंकर! नराधमांनी रुग्णालाही सोडलं नाही, कोरोनाबाधित तरुणीवर सामूहिक बलात्कार) शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेबाबात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सुनील खाटपे आणि सारंग गवळी यांच्यात रात्री दहा वाजेच्या सुमारास भांडण झालं होतं. त्या भांडणाचं कारण अगदी क्षुल्लक होतं. सारंग गवळी याने त्याच्या मोबाईलवर कामठे नावाच्या एका तरुणाचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं. पण सुनील खाटपे याचं त्याच्याशी शत्रुत्व असल्यानं त्यानं सारंग गवळी याला ते व्हॉट्सअप स्टेटस डिलिट करण्यास सांगितलं. गवळी याने नकार दिल्यानंतर यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. काही वेळानं गवळी तिथून निघून गेला. (वाचा-'चिकन बेचव झालंय'; मामाचे हे शब्द ऐकताच भाच्याचा चढला पारा, निर्घृण हत्या) या वागानंतर रागात असलेल्या सुनील खाटपे यानं मृत हनुमंत वाघाटेला फोनवर या सर्व प्रकाराची माहिती दिली. वाघाटे यानं खाटपेला आपण गवळीला धडा शिकवू असं म्हटलं. त्यानंतर हनुमंत वाघाटे सुनील खाटपेच्या घरी त्याला भेटायला आला. पण त्याचवेळी सारंग गवळी याच्या टोळीतल्या सदस्यांनी वाघाटेवर हल्ला केला. त्याला बांबू आणि काठ्यांनी मारहाण केली आणि नंतर रस्त्यावर पडलेला सिमेंटचा ब्लॉक त्याच्या डोक्यात घालून वाघाटेचा खून केला. या प्रकारानंतर काही वेळातच बिबवेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. इतर चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही कारणं आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder news, Pune

    पुढील बातम्या