पुण्यात गोळीबार! चोरट्यांनी कोयता-दगड भिरकावल्यावर पोलिसांनी चालवल्या गोळ्या
पुण्यात गोळीबार! चोरट्यांनी कोयता-दगड भिरकावल्यावर पोलिसांनी चालवल्या गोळ्या
पोलिसांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी स्वसंरक्षणात हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.
पुणे, 23 फेब्रुवारी : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला (Burglars attack on Police) केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. पोलिसांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी स्वसंरक्षणात हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. शहरातील सातारा रोड परिसरातील चाफळकर कॉलनीतील एका निवासी सोसायटीत ही घटना (Pune crime news) घडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी पहाटे पुण्यातील एका अनधिकृत अपार्टमेंटमध्ये घुसलेल्या चोरट्यांनी पोलिसांवर कोयता आणि दगडफेक केल्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार केला. घटनास्थळावरून पळून गेलेले चोरटे आणि पोलीस यापैकी कोणीही जखमी झालेलं नाही. पोलिसांनी सांगितले की, पहाटे 4 च्या सुमारास सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला काही चोरटे एका अपार्टमेंटमध्ये घुसताना दिसले आणि त्यांनी याविषयी पोलिसांना (Burglars attack pune) माहिती दिली.
हे वाचा - पुण्यातील लग्न सोहळ्यात बारबालांचा धांगडधिंगा; पैसे उडवत तरुणांचाही अश्लील डान्स
पोलिस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या, “संशयित घरफोडीचा फोन आल्यानंतर परिसरात गस्त घालणारे दोन बीट मार्शल चार मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. रात्रीच्या फेरीत आणखी एक अधिकारीही तिथे पोहोचला. अपार्टमेंटजवळ येताच चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्या दिशेने कोयता आणि दगडफेक केली. तीन ते चार चोरटे असल्याचे पोलिसांनी सांगितले. घरफोडी करणारे या सोसायटीच्या मागे असलेल्या झाडाच्या परिसरात पळून जाण्यात यशस्वी झाले.
हे वाचा - पुण्यातील मटका किंग खून प्रकरणात BJP कनेक्शन आलं समोर; बड्या पदाधिकाऱ्याला अटक
पहाटेच्या सुमारास चार ते पाच चोरटे याठिकाणी असलेल्या पाच मजली इमारतीमध्ये शिरले. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आवाज झाल्यामुळे शेजारचे नागरिक जागे झाले. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांनी शेजारील फ्लॅटला बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी नियंत्रण कक्षाला घरफोडीची माहिती दिली, अशी माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.