Home /News /pune /

1 क्विंटल चांदी, पाऊण किलो सोने आणि 45 गुन्हे, पोलिसांनी पकडले खतरनाक गुन्हेगाराला!

1 क्विंटल चांदी, पाऊण किलो सोने आणि 45 गुन्हे, पोलिसांनी पकडले खतरनाक गुन्हेगाराला!

विकीसिंग हा वारंवार पत्ते बदलून राहत होता. विकीसिंग हा नेहमी आपल्यासोबत शस्त्र बाळगत होता. एका घटनेत त्याने पोलिसांवरही गोळीबार केला होता.

पिंपरी चिंचवड, 12 ऑक्टोबर : दरोडा, जबरी चोरी, खून  यासह 45 गंभीर गुन्ह्यात मागील अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या गुन्हेगारांकडून तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांची ही मोठी कामगिरी ठरली आहे. विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय 31), विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय 19 ) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. 20 सप्टेंबर रोजी वाकड रोड येथे पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडून त्यामधील तीन किलो चांदी आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबद्दल वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्याच रात्री निगडी येथील नावकर ज्वेलर्स फोडून 20 किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पुन्हा सहा दिवसांनी अर्थात 26 सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने लुटण्यात आले.  एकापाठोपाठ झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर दरोडेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. भरधाव मारुती एर्टिगा कार झाली आउट ऑफ कंट्रोल, रस्ता सोडून उलटली; एक ठार त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित पोलीस स्टेशनला आरोपींचा कसून शोध घेण्याची सूचना दिल्या.  वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्त्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांची दोन पथके तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरू केला. निगडी इथं झालेल्या दरोड्यात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये एक इको कार आढळून आली होती. त्यावरून पोलिसांनी त्या कारचा शोध घेतला असता लोणी काळभोर आणि लोणीकंद येथून दोन इको कार चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आपली शोधमोहीम  खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली भागात सुरू केली. मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी याची टोळी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तब्बल दहा दिवस या परिसरात तळ ठोकून होते. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला.  हा धाडसी दरोडा सराईत गुन्हेगार विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी आणि त्याच्या टोळीनेच केला होता. झुंज संपली, कोरोनाशी दोन हात करताना सुरेखा महाडिक यांचे निधन विकीसिंग कल्याणी हा दरोडा, जबरी चोरी, खून यासारख्या 41 गंभीर गुन्ह्यात अटक होता. एवढंच नाहीतर आणखी वेगवेगळे असे 15 गुन्हेही त्याच्यावर दाखल होते. या 15 गुन्हांमध्ये तो फरार होता. विकीसिंग हा वारंवार पत्ते बदलून राहत होता. विकीसिंग हा नेहमी आपल्यासोबत शस्त्र बाळगत होता. एका घटनेत त्याने पोलिसांवरही गोळीबार केला होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना आव्हानात्मक होते. वाकड पोलिसांच्या पथकाला अखेर विकीसिंग कल्याणी हा एका कारने जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने क्षणाचा विलंब न करता सापळा रचून विकीसिंग कल्याणीला एका साथीदारासह पकडले. त्याच्या कारची तपासणी केली असता  दोन लोखंडी कटावण्या, दोन कटर, सहा स्क्रू ड्रायव्हर, एक स्प्रे कॅन असे साहित्य सापडले होते. तर विकीसिंगकडे एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे सापडले होते.  पोलिसांनी चौकशी केली असता विकीसिंगने पीआर ज्वेलर्स हे दुकान फोडल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली.  या दोघांना न्यायालयात हजर केले असता 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असताना अटक केलेल्या आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसोबत मिळून वाकडसह जवळील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 34 गुन्हे केल्याचे सांगितले. या गुन्ह्यातील एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचे 750 ग्राम सोने, 100 किलो चांदी, तीन कार, एक पिस्टल, पाच काडतुसे, कटावण्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिलेचा निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह; शरीरावर अमानुष मारहाणीच्या खुणा पिंपरी चिंचवड परिसरात पोलिसांनी आतापर्यंत केली ही एक मोठी कामगिरी होती. ही कामगिरी,  पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, जावेद पठाण, वजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरज सुतार, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, शाम बाबा, नितीन ढोरजे, दीपक भोसले, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, नूतन कोंडे यांच्या टीमने केली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या