Home /News /pune /

आखड पार्टी नडली! पुण्यात 11 डॉक्टरांसह 2 हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल

आखड पार्टी नडली! पुण्यात 11 डॉक्टरांसह 2 हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये आखाड (आषाढ) पार्टी करणाऱ्या 11 डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे, 18 जुलै:  शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये आखाड (आषाढ) पार्टी करणाऱ्या 11 डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे येथे ही पार्टी सुरू होती. पाच पेक्षा जास्त नागरिक एकत्र आल्याने कोरोना काळात नियम तोडले म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याशिवाय दोन हॉटेल मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हेही वाचा.... भयंकर! गुप्तांगावर लोखंडी गजाने वार करून एकाचा खून, विवस्त्र अवस्थेत शेतात फेकलं मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत वस्तीजवळ एका हॉटेलमध्ये पाच पेक्षा अधिक डॉक्टरांनी एकत्र येत गर्दी जमवली होती. शासकीय नियमानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असताना देखील ओली पार्टी करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलिस शिपाई विकास मोरे यांसह आदींनी त्या ठिकाणी जात छापा टाकला असता सर्व डॉक्टर पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता शिक्रापूर, सणसवाडी परिसरातील तब्बल अकरा डॉक्टरांनी एकत्र येत ओली-सुकी पार्टी करत असल्याचे आढळून आले. हेही वाचा...धुळ्यात घडलं थरकाप उडवून देणारं हत्याकांड, गँगवॉरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई विकास मोरे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर सणसवाडी परिसरातील तब्बल अकरा डॉक्टरांसह दोन हॉटेलच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Pune crime, Pune news, Pune police

पुढील बातम्या