मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, Tinder वर झालेल्या ओळखीनेच केला घात

पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, Tinder वर झालेल्या ओळखीनेच केला घात

वाकड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे, 28 डिसेंबर : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Pune Rape Case) करून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख ऑनलाइन डेटिंग असलेल्या टिंडर अ‍ॅप्लिकेशनवरून झाली होती. पीडित तरुणी इंडिगो एअर लाईन्स या कंपनीत एअर होस्टेस म्हणून नोकरीला आहे. अभिजित सीताराम वाघ असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी आणि पीडित तरुणी यांची टिंडरवरून ओळख झाल्यानंतर दोघांनी एका हॉटेलवर भेटण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यानंतर हॉटेल बंद असल्याने आरोपीने तरुणीला स्वतःच्या दुचाकीवर घेऊन थेट आपल्या घरी नेलं. पीडित तरुणीला दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार करत जबर मारहाण केली आहे.

यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी माझ्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच काढला काटा!

दरम्यान, तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे टिंडरसारखी डेटिंग अ‍ॅप्स तरुणाईला भुरळ घालत असतात. मात्र या डेटिंग अ‍ॅपचा वापर करत असताना कोणी आपला घात तर करणार नाही ना, याची काळजी घेण्याची गरज पुण्यातील घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

First published:

Tags: Pune (City/Town/Village), Pune police