मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Covishield Vaccine किमतीत का करण्यात आली वाढ? Serum ने सांगितलं 'हे' कारण

Covishield Vaccine किमतीत का करण्यात आली वाढ? Serum ने सांगितलं 'हे' कारण

Covishield Vaccine price: सीरम इन्स्टिट्यूट निर्मित कोविशिल्ड लस खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांत विक्री करण्यात येणार आहे.

Covishield Vaccine price: सीरम इन्स्टिट्यूट निर्मित कोविशिल्ड लस खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांत विक्री करण्यात येणार आहे.

Covishield Vaccine price: सीरम इन्स्टिट्यूट निर्मित कोविशिल्ड लस खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांत विक्री करण्यात येणार आहे.

  • Published by:  Sunil Desale

पुणे, 24 एप्रिल: कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीच्या किमती (Covishield Vaccine price)वरुन सीरम इन्स्टिट्यूटवर टीका होत होती. यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India Pvt Ltd.)ने शनिवारी एक प्रसिद्धी पत्रक काढून सविस्तर माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने म्हटलं, कोविशिल्ड लसीची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे. ही लस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महत्वाची आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर औषधांच्या तुलनेत लसीची किंमत कमी आहे.

कंपनीने सांगितले की, लसीची मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी गुंतवणूक करावी लागेल म्हणून किमतीत वाढ करण्यात आली आहे.

कंपनीने पुढे म्हटलं की, कोविशिल्ड ही लस बाजारात सर्वात स्वस्त लस आहे. सुरुवातीला या लसीची किंमत खूपच कमी ठेवली जात होती कारण, बऱ्याच देशांनी लस निर्मितीसाठी आर्थिक मदत केली होती जेणेकरुन जोखीम घेऊन ही लस विकसित केली जाऊ सकते. यासोबतच लसीकरणासाठी भारतासोबतच इतरांनाही कोविशिल्ड लस स्वस्त दरात पुरवली गेली आहे.

वाचा: जगात सर्वात स्वस्त भारताची Covishield कोरोना लस; Serum ने जारी केली किंमत

सध्या परिस्थिती खूपच आव्हानात्मक आहे. कोरोनाचा स्ट्रेन सातत्याने बदलत आहे आणि नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. हे सर्व पाहता लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि विस्तार अधिक करण्यासाठी गुंतवणूक कायम राखणे आवश्यक आहे. जेणेकरून आम्ही आपल्या क्षमतेने लस निर्मिती करुन आणि लोकांचे प्राण वाचवू शकू.

काही दिवसांपूर्वीच सीरम इन्स्टि्ट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड लसीच्या किमती जाहीर केल्या होत्या. या किमतीनुसार कोविशिल्ड लसीचा एक डोस राज्य सरकारला 400 रुपये दराने तर खाजगी रुग्णालयांना 600 रुपये दराने देण्याचं म्हटलं होतं. कंपनीने सांगितले की, सध्याचे डोस 150 रुपये दराने केंद्र सरकारला दिले जात आहेत हे संपल्यानंतर केंद्राला सुद्धा प्रति डोस 400 रुपये दराने विक्री करण्यात येईल.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus