पुणे, 9 एप्रिल: कोरोना विषाणूची (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बध घालून मिनी लॉकडाऊन (Maharashtra mini lockdown) जाहीर केला आहे. मात्र, असे असतानाही राज्यात दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. आज राज्यात 58,993 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुण्यात (Maximum active cases in Pune) आहेत.
सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात
राज्यात आज रोजी एकूण 5,34,603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 100051 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 629174 बाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 520496 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 8575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर इतर कारणांमुळे 52 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यानंतर मुंबईत 88053 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्हयात 67479 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील कोरोनाची स्थिती काय?
आज राज्यात 45,391 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 26,95,148 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.96% एवढे झाले आहे. आज राज्यात 58,993 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 301 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.74% एवढा आहे.
हे पण वाचा: Alert! पुण्यात Weekend Lockdown सुरू; सोमवार सकाळपर्यंत असणार कडक पहारा, काय आहेत नवे नियम?
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,16,31,258 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 32,88,540 (15.2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26,95,065 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 24,157 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात 58,993 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 32,88,540 झाली आहे. पाहूयात कुठल्या विभागात किती नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
ठाणे विभाग - 20939
नाशिक विभाग - 6040
पुणे विभाग - 12516
कोल्हापूर विभाग - 4192
औरंगाबाद विभाग - 2456
लातूर विभाग - 3106
अकोला विभाग - 2248
नागपूर विभाग - 5720
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Pune