देशात कोरोना लसीकरणाचं DRY RUN सुरू होण्याआधी पुण्यातून आली पॉझिटिव्ह बातमी

देशात कोरोना लसीकरणाचं DRY RUN सुरू होण्याआधी पुण्यातून आली पॉझिटिव्ह बातमी

देशात कोरोना लशीचं ड्राय रन (Corona Vaccine Dry Run) सुरू होण्याआधी पुण्यातून आली गोड बातमी. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे.

  • Share this:

पुणे, 07 जानेवारी : देशात 8 जानेवारीला कोरोना लशीचं ड्रायल (Covid-19 Vaccination dry run) सुरू होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. त्याआधीच पुण्यात एक गोड बातमी मिळते आहे. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे. पुण्याहून (pune) दिल्लीला (delhi) कोव्हिशिल्डची (COVIDSHIELD) पहिली खप आज पोहोचणार आहे. पुण्याहून कोव्हिडशिल्ड घेऊन पहिलं विमान दिल्लीत लँड होणार आहे.

पुण्याहून कोव्हिशिल्ड घेऊन AI 850 विमान दिल्लीच्या दिशेनं रवाना झालं आहे. रात्री 9 वाजता हे विमान दिल्ली विमानतळावर लँड होईल. आता अवघी काही मिनिटं शिल्लक राहिली आहेत.

28 आणि 29 डिसेंबरला चार राज्यांमध्ये दोन दिवस ड्राय रन घेण्यात आलं होतं. यानंतर 2 जानेवारीला सर्व राज्यातील 285 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन झालं. आता 8 जानेवारील संपूर्ण देशात ड्राय रन होणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणाची देण्याआधी ही तालीम घेतली जाते आहे. जेणेकरून लसीकरणार कोणतीही समस्या, अडचण उद्भवणार नाही.

रुग्णालयाच्या हवेत सापडला कोरोनाव्हायरस; 2 तासांपेक्षाही अधिक काळ जिवंत

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड ही कोरोना लस. या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळालेली आहे. 13 किंवा 14 जानेवारीला प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.

Budget 2021 : कोणता अर्थसंकल्प सामान्य माणसांसाठी ठरतो फायदेशीर?

सरकारने केलं अलर्ट!

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी बुधवारी लोकांना Co-WIN अ‍ॅपच्या नावाखाली कोणतंही बनावट Mobile App डाऊनलोड करणे आणि त्यावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करण्याबाबत सावध केले आहे. असे कोणतेही काम न करण्याचा इशारा त्यांनी नागरिकांना दिला आहे. सरकारकडून याबाबत एक ट्वीट करण्यात आले आहे. या ट्टीटनुसार गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर Co-WIN अ‍ॅपच्या नावाशी मिळते जुळते अनेक अ‍ॅप उपलब्ध झाले आहेत. जे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारू शकतात. काही अ‍ॅप्स असे देखील आहेत, जे 10 हजारपेक्षा अधिक जणांनी डाऊनलोड देखील केले आहे. यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

First published: January 7, 2021, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading