मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

VIDEO: रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह आढळला; पुण्यातील घटनेने खळबळ

VIDEO: रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह आढळला; पुण्यातील घटनेने खळबळ

Pune missing covid positive woman found dead: रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळला आहे.

पुणे, 13 मे: पुण्यातील रुग्णालयातून (Pune hospital) बेपत्ता झालेल्या वयोवृद्ध महिलेचा मृतदेह (missing women found dead) आढळून आला आहे. ही महिला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून बेपत्ता झाली होती. पुण्यातील होप रुग्णालयातून ही महिला अचानक बेपत्ता झाली होती. ही महिला रुग्णालयाबाहेर जात असल्याचं सीसीटीव्ही फूटेज (CCTV footage) सुद्धा आता समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भवानी पेठेत असलेल्या होप रुग्णालयातून एक कोरोना बाधित महिला (Covid positive woman) अचानक बेपत्ता झाली होती. दोन दिवसांपूर्वी ही महिला बेपत्ता झाल्याने नातेवाईकांकड़ून समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. याच दरम्यान आज या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

वाचा: हायकोर्टाने पोलखोल केल्यानंतर पुणे पालिका वठणीवर, कॉल सेंटरची यंत्रणाच बदलली!

कोरोनाचा संसर्ग झाल्याने या महिलेला पुण्यातील भवानी पेठेतील होप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ही महिला अचानक एकटीच रुग्णालयातून बाहेर पडली. ही महिला रुग्णालयाच्या बाहेरील रस्त्यावरुन जात असल्याचं सीसीटीव्ही फूटेज सुद्धा समोर आलं आहे. मात्र, एका खाजगी रुग्णालयातून कोविड बाधित महिला रुग्णालयातून बाहेर जातेच कशी? हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाहीये का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. पण, कोरोना झाल्यावर भीतीने या महिलेने रुग्णालयातून जाण्याचा निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज सकाळच्या सुमारास हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या महिलेचा मृतदेह आढळून आला.

First published:

Tags: Cctv footage, Coronavirus, Pune