Impact: ‘News18 लोकमत’ने बातमी दाखवताच पुण्यात मायलेकींना मिळाला आधार!

त्यांची व्यथा दाखवताच हॉस्पिटलने तात्काळ या फॅमिलीची निवास आणि जेवणाची व्यवस्था केली.

त्यांची व्यथा दाखवताच हॉस्पिटलने तात्काळ या फॅमिलीची निवास आणि जेवणाची व्यवस्था केली.

  • Share this:
पुणे 05 सप्टेंबर: पती कोरोना पॉझिटिव्ह निघाला म्हणून त्याच्या औषधोपचारासाठी पुण्यात आलेल्या आई आणि तिच्या मुलीवर हॉस्पिटल पार्किंगमध्ये राहण्याची वेळ आली होती. त्या मायलेकींची दुरावस्था ‘News18 लोकमत’ने दाखवली आणि काही वेळातच त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. आता त्या दोघींनाही आधार मिळाला असून त्यांची राहण्याची आणि जेवणाचीही सोय झाली आहे. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवताच औंध हॉस्पिटलमधील त्या मायलेकींना आता सगळीकडूनच मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुण्यातील झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरीष मुरूमकर यांनी त्या हॉस्पिटलमध्ये या मायलेकिंना ब्लँकेट, खाद्यपदार्थ, साबनसोडा असं जीवनपयोगी साहित्य दिलं. तर इतर संस्थांकडूनही मदत येत आहे. या मायलेकी गेली 7 दिवस औंध हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये राहत होत्या. त्यांची व्यथा दाखवताच हॉस्पिटलने तात्काळ या फॅमिलीची निवास आणि जेवणाची व्यवस्था केली. या महिलेच्या पतीवर त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. कोरोनाच्या काळात माणुसकी मेली असं वाटत होतं, मात्र जगण्याची आशा जिवंत झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. काय आहे प्रकरण? महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह आहे. लोणावळा येथे हे कुटुंब एका कारभाऱ्याकडे कामाला होते. तिथेच ते राहत होतं. पती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर कारभाऱ्यानं थोडे पैसे देऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये जा असं सांगितलं. महिलेनं कोरोनाबाधित पतीला सोबत घेऊन पुणं गाठलं पती महिलेनं अर्धा तास डॉक्टरांचे पाय धरले तेव्हा तिच्या पतीला दाखल करून घेतलं. COVID-19: महाराष्ट्र हादरला, 24 तासांत आढळले 20 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण या मायलेकी फक्त दुपारचं जेवण 5 रुपयांत शिवभोजन थाळीच्या रुपात खातात. संध्याकाळी मात्र उपाशी झोपतात. शेजारील शिंदे नावाच्या ताईंनी 2/3 दिवस डबा दिला, पांघरून दिलं. Online क्लास सुरू असतांनाच प्राध्यापिकेचा कोरोनाने मृत्यू, विद्यार्थ्यांना धक्का आता पुढे अजून 8 दिवस काय करायचं असा मोठा प्रश्न या मायलेकीसमोर होता. कोरोनामुळे माणुसकी मेली की काय अशी ही घटना होती. . सामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहे. तरी सरकारनं कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडेही लक्ष द्यायला हवं, अशी मागणी केली जात आहे. आता मदत मिळाल्याने माणुसकी जिवंत आहे याचा पुन्हा प्रत्यय आला आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: