पुणे 09 सप्टेंबर: पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. देशात पुणे सर्वात वरच्या क्रमांकावर गेलं आहे. अशी परिस्थिती असतांना बुधवारी पुणे जिल्ह्यातल्या मंचरमध्ये 24 तासांमध्ये 176 रुग्ण आढळून आलेत त्यामुळे एकच खळबळ उडाली. एखाद्या गावात एकाच दिवशी सर्वाधिक रूग्ण सापडण्याची ही देशातली ही पहिलीच घटना आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची न्यूज18 लोकमतला ही माहिती दिली. त्यामुळे मंचर पुणे जिल्ह्यातील नवा कोरोना हॉटस्पॉट बनला आहे.
झेडपी आरोग्य विभागाकडून आज मंचर गावात 1001 रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 176 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर उर्वरित तालुक्यातही 33 रूग्ण आढळून आले आहेत. मंचर तालुक्यात एकूण 209 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
20 हजार लोकसंख्येचं मंचर हे बाजाराचं गाव आहे. हायवेला लागून असल्याने इथे अनेक गावातल्या लोकांची वर्दळ असते. सुरक्षा नियमांचं पालन केलं नसल्याने कोरोनाचा फैलाव वेगानं होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतात Oxfordच्या लशीची चाचणी थांबणार का? कंपनीने केला खुलासा
मंगळवारी 75 हजार कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा 89 हजार 706 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या 43 लाख 70 हजार 129 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत 1115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांची संख्या 73 हजार 890 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 33 लाख 98 हजार 845 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर अजूनही 8 लाख 97 हजार 394 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
भारताच्या तिन्ही लशींचा पहिला टप्पा यशस्वी, वाचा कधी येणार बाजारात
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 10 लाख लोकसंख्येत 3,102 रुग्ण सापडत आहेत. भारताच्या तुलनेत इतर देशांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी आहे. असे असले तरी भारताचे मृत्यूदर केवळ 1.70% आहे, जगभरातील इतर देशांच्या तुलनेत हा कमी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus