Home /News /pune /

कोरोनावर मात करून आली बहीण, घरात झालं भन्नाट स्वागत, पाहा VIDEO

कोरोनावर मात करून आली बहीण, घरात झालं भन्नाट स्वागत, पाहा VIDEO

सलोनीने हट जा रे छोकरे…हे गाणं लावलं आणि बहीणीचं स्वागत केलं. तर तिच्या आईने औक्षण करून तिला घरात घेतलं.

    पुणे 18 जुलै:  कोरोनाने पुण्याला विळखा घातलाय. दररोज संख्या वाढत आहे. त्याचबरोबर लोक त्याचा आता हिंम्मतीने सामनाही करत आहेत. अशा  घटना आता समोर येत आहेत. पुण्याच्या स्वामी समर्थ भागात राहणाऱ्या एका तरुणीने कोरोनामुक्त झालेल्या आपल्या बहिणीचं दणक्यात गाण्याच्या तालावर नाचत स्वागत केलं. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सलोनी सातपूते असं त्या तरुणीचं नाव असून घरातले 5 सदस्य पॉझिटिव्ह निघाले. सलोनी एकटीच निगेटिव्ह आली. इतर सदस्यही आता बरे होत आहेत आज तिची बहीण घरी आल्यावर तिने अतिशय भन्नाट पद्धतीने तिचं गाण्यांच्या तालावर स्वागत केलं आणि आपला लढाऊ बाणा सिद्ध केला. सलोनीने हट जा रे छोकरे…हे गाणं लावलं आणि बहीणीचं स्वागत केलं. तर तिच्या आईने औक्षण करून तिला घरात घेतलं. काहींणी हा व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. Coronavirus ची दहशत राज्यात (Maharashtra coronavirus updates) कायम आहे. कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच 1 लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस खाली येत असला, तरी या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे. आज राज्यात तब्बल 8348 नव्या रुग्णांची भर पडली. तर 144 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,00,937वर गेली आहे. तर एकूण मृत्यू 11596 एवढे झाले आहेत. तर मुंबईत आज 1186 नवे रुग्ण आढळले तर 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 1,00,350 एवढी झाली. तर आत्तापर्यंत 5650 जणांचा मृत्यू झाला.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या