COVID-19: पुण्यात आता नागरिकांसाठी आचारसंहिता, घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या नियम!

COVID-19: पुण्यात आता नागरिकांसाठी आचारसंहिता, घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या नियम!

सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुद्धही महापालिकेने कारवाईला सुरूवात केली आहे. 5 दुकाने सील करण्यात आली आहेत.

  • Share this:

पुणे 17 सप्टेंबर: कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिका आता नव्या उपाय योजना करणार आहे. मुंबई प्रमाणेच नागरिकांसाठी आता आचारंहिता लागू करण्यात येणार आहे. शुक्रवार (18 सप्टेंबर)पासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कोरोनाचा प्रसार वेगात होत असल्याने महापालिका नवे नियम करणार आहे. जे या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना दंडही करण्यात येण्याची शक्यता आहे.

या नियमांमध्ये दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही. आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणेही सक्तीचं करण्यात येणार आहे.

तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुद्धही महापालिकेने कारवाईला सुरूवात केली आहे. नियमांच पालन न करणाऱ्या 5 दुकानदारांविरुद्ध महापालिकेने कारवाई केली आहे.

देशामध्ये सर्वाधिक मृत्यूचा दर असलेला तालुका अशी जुन्नरची नवी ओळख तयार झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतची माहिती News18 लोकमतला दिली. सर्वाधिक मृत्युदर कशामुळे वाढला आहे, याची माहिती आता समोर आली आहे.

Covid संसर्गाच्या गतीत मोठी वाढ; 39 दिवसांत 2 वरून रुग्णसंख्या 3 कोटींच्या पार

ग्रीन पट्टा अशी ओळख असलेल्या किल्ले शिवनेरीचा परिसराला सुरुवातीपासूनच कोरोनाचं ग्रहण लागले होते. त्यामुळे जुन्नरमध्ये महसूल आणि आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी मोठी काळजी घेतली गेली. ओझर लेण्याद्री या ठिकाणी दोन मोठी कोविड सेंटरही उभारण्यात आली. मात्र, रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढतच आहे.

तालुक्यात ज्या गावांमध्ये रुग्ण वाढत होते तिथे अनेकदा लॉकडाऊनही केलं पण हा आकडा वाढता वाढता वाढतच आहे. यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने समुपदेशनही केलं जातं आहे.

धक्कादायक! मुंबईत माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू

भारतानेही कोरोनाविरोधातील लस (India corona vaccine) तयार करून त्याचं ट्रायल सुरू केलं आहे, मात्र ही कोरोना लस कधी मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (health minister Dr Harsh Vardhan) यांनी राज्यसभेत याचं उत्तर दिलं आहे. 2021 वर्षाच्या सुरुवातीला भारताला कोरोनाची लस उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना महासाथीची देशातील सद्य परिस्थिती, त्यावरील उपचार आणि लशींबाबत राज्यसभेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी याबाबत निवेदन सादर केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 17, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या