मराठी बातम्या /बातम्या /पुणे /बँकांचं कर्ज थकल्यानं भाजपचे माजी खासदार अडचणीत; संपत्ती जप्त होणार!

बँकांचं कर्ज थकल्यानं भाजपचे माजी खासदार अडचणीत; संपत्ती जप्त होणार!

न्यायालयाकडून बंगला जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाकडून बंगला जप्त करण्याचे आदेश

बँकांचं कर्ज थकवल्याप्रकरणी न्यायालयानं बंगल्याचा ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 17 मार्च : डीएचएफएल बँकेचं कर्ज थकवल्यामुळे पुण्यातील भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं माजी खासदार संजय काकडे यांचा बंगला जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. संजय काकडे यांनी आपली स्थावर मालमत्ता विविध बँकांकडे गहान ठेवून कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र हे कर्ज काकडे यांनी वेळेत न फेडल्यानं आता बँकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

बंगल्याचा ताबा घेण्याचे आदेश 

थकीत कर्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं संजय काकडे यांच्या राहात्या बंगल्याचा प्रतिकात्मक ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. संजय काकडे यांनी त्यांची स्थावर मालमत्ता विविध बँकांकडे गहान ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाची परतफेड न करण्यात आल्यानं आता बँकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे.

राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण

या प्रकरणात न्यायालयानं संजय काकडे यांच्या राहत्या बंगल्याचा प्रतिकात्मक ताबा तर शिवाजी हाउसिंग सोसायटीतील फ्लॅटचा ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: BJP, Pune