मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

कुख्यात गुंड गजानन मारणे याने न्यायालयात असं कोणतं उत्तर दिलं की त्याला थेट जामीनच मिळाला?

कुख्यात गुंड गजानन मारणे याने न्यायालयात असं कोणतं उत्तर दिलं की त्याला थेट जामीनच मिळाला?

 भारतीय मुली केवळ मनोरंजनासाठी सेक्स करत नाहीत, अशा शब्दांत हाय कोर्टानं कानउघडणी केली आहे.

भारतीय मुली केवळ मनोरंजनासाठी सेक्स करत नाहीत, अशा शब्दांत हाय कोर्टानं कानउघडणी केली आहे.

कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचा दावा गजानन मारणे याने केला आणि हा दावा न्यायालयाने मान्य केल्यामुळे गजा मारणेचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.

पुणे, 17 फेब्रुवारी : तुरुंगातून सुटका होताच 300 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजा मारणे याला आज कोथरूड पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. मात्र कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही रॅली न आल्याने आणि कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचा दावा गजानन मारणे याने केला आणि हा दावा न्यायालयाने मान्य केल्यामुळे गजा मारणेचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. यावेळी झालेल्या युक्तिवादात चाळीस पोलीस ठाणे ओलांडूनही आपल्याला एकाही पोलिसाने अडवले नसल्याचं मारणेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. तसंच कुठलाही गुन्हा केलेला नसताना केवळ मीडिया ट्रायलपोटी कोथरूड पोलिसांनी चुकीची कारवाई केली असल्याचा दावा त्यांनी केला आणि न्यायालयाने हा दावा ग्राह्य धरत मारणे याला जामीन दिला आहे. या प्रकरणानंतर तातडीने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तळेगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मारणे आणि त्याच्या साथीदारांना वर्ग करण्यासही नकार दिला आहे. हेही वाचा - गुंड गजानन मारणेच्या मिरवणुकीचे चक्क ड्रोन कॅमेऱ्याने शुटिंग, पोलीसही झाले हैराण दुसरीकडे, शरद मोहोळ याच्यावरही पोलिसांनी तब्बल एक महिना उशिरा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढत शरद मोहोळ यालाही जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे न्यायालयात आज पुन्हा पोलिसांच्या ढिसाळपणाची लक्तरं समोर आली. दरम्यान, दरम्यान, पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली.
First published:

Tags: Pune (City/Town/Village), Pune crime

पुढील बातम्या