Elec-widget

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले प्रेमी दाम्पत्य पुण्यात सापडले अशा अवस्थेत...

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले प्रेमी दाम्पत्य पुण्यात सापडले अशा अवस्थेत...

प्रेमी दाम्पत्य दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता होते. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. पण, त्यांचा काही पत्ता लागला नाही.

  • Share this:

पुणे,19 सप्टेंबर: प्रेमी दाम्पत्य दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता होते. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. पण, त्यांचा काही पत्ता लागला नाही. अखेर गणेश म्हस्कु नागरे (रा.वाघोली, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. बुधवारी (18 सप्टेंबर) सकाळी सोलापूर रस्त्यावरील लोणीकंद येथील दगडी खाणीच्या पाण्यात दोघे मृतावस्ठेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 15 सप्टेंबर रोजी दोघे सकाळी दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेले होते. मंगेश नागरे (वय-26) व प्रियंका नागरे (20, रा. वाघोली, पुणे) अशी मृतांची नावे आहेत.

पाण्यावर तरंगत होते मृतदेह...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगेश आणि प्रियांका बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. कुटुंबियांनी त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळीही दोघांचा शोध घेत होते. परंतु ते सापडले नाही. अखेर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असता, बुधवारी सकाळी लोणीकंद मधील दगडी खाणीत दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तसेच ओळख पटवून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात मृतदेह रवाना केले. त्या दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मंगेश आणि प्रियांका यांच्या मृत्यूमागे घातपात आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

दुचाकीसोबत वाहून चालले होते तरुण, लातूरचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...