आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का

आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का

आपल्याच सहकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी मानकर हे दीड वर्षांपासून तुरूंगात होते.

  • Share this:

वैभव सोनावणे, पुणे 22 ऑक्टोंबर : वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकप्रकरणात पुणे पोलिसांना मोठा धक्का बसलाय. पुणे पोलिसांनी लावलेलं मोक्काचं कलम उच्च न्यायालयाने हटवलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दीपक मानकर यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मानकर यांच्यावर गुंडगिरीचा आरोप कायम होत असतो. राजकीय पक्षात प्रवेश करून आपल्या गुन्हेगारी कृत्यांवर पांघरून खालण्याचे उद्योग मानकर करत असतात असा त्यांच्यावर आरोप होत असतो. जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून मानकर पुण्यातल्या येरवडा तुरुंगात होते. जितेंद्र जगताप हे मानकर यांचेच कार्यकर्ते होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

ड्रग्ज् तस्करांकडून पैसे घेऊन पोलीस स्टेशनमध्येच ठेवले, पाच पोलिसांना अटक

त्याआधी चिठ्ठी लिहून आत्महत्येला मानकरच जबाबदार आहेच असं जगताप यांनी लिहिलं होतं. त्यानंतर मानकर यांना अटक झाली होती. अटक करताना पोलिसांनी त्यांच्यावरुद्ध मोक्का लावला होता. त्याविरोधात मानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचा मोक्का हटविण्याचा आदेश दिला. त्यामुळे त्यांना जामीन मिळायचा मार्ग मोकळा झालाय. मानकर हे गेले दीड वर्ष येरवडा कारागृहात होते.

प्रदीप शर्मांना टक्कर देणाऱ्या हितेंद्र ठाकुरांनी जाहीर केला मोठा निर्णय

कोण आहेत दीपक मानकर?

दीपक मानकर हे माजी उपमहापौर होते

- आत्ता राष्ट्रवादीचे नगरसेवक

- मनी आणि मसल पॉवर असलेला नेता अशी ओळख

- दीपक मानकर यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले होते

- पुण्यामध्ये जमीन माफियी म्हणून मानकर यांची पुण्यात दहशत

- पुण्यात नातू कुटुंबीय, विजयकुमारसिंग यांच्यासह अनेकांना जमिनीसाठी धमकावलं होतं

- फरासखाना ,शिवाजीनगर ,चतुशृंगी पोलीस ठाण्यात होते जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हे

- मानकर यांच्या विरोधात 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या