पुणे, 16 डिसेंबर : कोरोनाच्या (Corona) काळात भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारने भष्ट्राचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पण आता भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे महापालिकेमध्ये (pune municipal corporation) गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे.
कोरोनाच्या काळात पुणे महापालिकेकडून कंटेन्मेंट झोन्समध्ये 70 हजार किट्स वाटण्यात आल्या होत्या. पण या किट्समध्ये असलेल्या वस्तू या चढाभावाने खरेदी करण्यात आल्या होत्या, असा आरोप मनसेने केला आहे. 'कंटेन्मेंट झोन्समध्ये वाटलेल्या या 70 हजार किट्समधील वस्तूंची चढ्या भावाने खरेदी करून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
या व्यवसायात आहे दमदार फायदा, तुम्हाला मिळेल 9 लाखांपर्यंत उत्पन्न
तर कॉंग्रेसने ही पुणे पालिकेवर गंभीर आरोप केला आहे. पालिकेनं कोरोनाच्या काळात टेंडर प्रक्रियेला फाटा देत मनमानी पद्धतीनं विविध विभागात कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Bollywood Drug Case: क्षितीज प्रसादच्या जामीनानंतर मित्रमंडळींचं सेलिब्रेशन
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्येही गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कोविड सेंटरमध्ये आधी मोफत दिली जाणारे रेमेडीसियर औषध हे 5, 10 हजार रुपयांना विकून पैसे कमवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसंच, कोविड सेंटर उभारणीत कोट्यवधींची उधळपट्टी केली असाही आरोप करण्यात आला आहे.