Home /News /pune /

BREAKING : पुणेकरांचा श्वास मोकळा; 1 नोव्हेंबरपासून उद्यानं खुली पण असणार नव्या अटी

BREAKING : पुणेकरांचा श्वास मोकळा; 1 नोव्हेंबरपासून उद्यानं खुली पण असणार नव्या अटी

1 नोव्हेंबर पासून पुणे शहरातील (Pune news) उद्याने, बागा सुरू होणार (Unlock) त्याची नियमावली महापालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. फक्त 4 च तास उद्यानं उघडणार आहेत.

    पुणे, 29 ऑक्टोबर : Lockdown मध्ये गेली अनेक महिने बंद असलेली उद्यानं आणि बागा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना स्वच्छ हवेत मोकळा श्वास घेता येईल. Coronavirus मुळे गेली 8 महिने बागा बंद होत्या. रविवार 1 नोव्हेंबर पासून शहरातील उद्याने, बागा सुरू होणार त्याची नियमावली महापालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. शनिवारच्या कोजागिरी पौर्णिमेला मात्र बागेत जाऊन चांदण्यात कोजागिरीची रात्र साजरी करता येणार नाही. उद्यानं खुली होणार असली तरी ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांखालच्या मुलांना मात्र बागेत अद्याप प्रवेश दिला जाणार नाही. पुणे महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून कंटेन्मेंट झोन वगळता सर्व शहरातली उद्यानं सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळात उघडी राहतील. दिवसभरात फक्त 4 तास बागा खुल्या असतील. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि मास्क अनिवार्य आहे. बागा उघडल्या तरी बागेतली घसरगुंडी, झोपाळे, सी सॉ अशी खेळणी आणि ओपन जिममधली व्यायामाची उपकरणं वापरता येणार नाहीत. 8 महिने बंद असलेली शहरातील 85 उद्याने 1 नोव्हेंबर पासून खुली होणार आहेत. पण नियमभंग करणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. काय आहेत नियम? सकाळी 6 ते 8 संध्याकाळी 5 ते 7 चारच तास उद्यानं खुली मास्क,सॅनिटायजरचा वापर अनिवार्य 6 फूट शारीरिक अंतर पाळणं बंधनकारक 10 वर्षांच्या खालील मुलं आणि 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक यांना प्रवेश नाही घसरगुंडी, झोके ,सी सॉ ही खेळणी तसंच जिम,व्यायामाची सामुग्री  वापरता येणार नाही नियमभंग केल्यास  संबंधित उद्यान बंद करणार शाळाही दिवाळीपूर्वी नाहीच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असले तरी शाळा केव्हापासून सुरू होणार याबाबतची  माहिती समोर आली आहे. राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 50 टक्के शिक्षकांना कामावर हजर होण्याच्या आदेशाला शिक्षक आमदारांचा विरोध राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांच्या शाळा सुरू करताना अधिक विचार करण्याची गरज आहे. दुसरीकडे त्यानंतरचे इतर वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू होतील. विषेश म्हणजे सरसकट शाळा सुरू करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याच्यादृष्टीने हे आवश्यक आहे. राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आरोग्य विषयक सर्व सुचनांचे व खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Pune

    पुढील बातम्या