पुणे, 7 मे: पुणे शहरात (Pune City) गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. यामुळे पुणेकरांना एक दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याच दरम्यान पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (Pune rural area) कोरोनाने (Coronavirus spike) अक्षरश: थैमान घातल्याचं पहायला मिळत आहे. ग्रामीण भागात केवळ बाधितांच्या संख्येत वाढ होत नाहीये तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. परिणामी अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना रांगा (waiting for funeral) लावाव्या लागत आहेत.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनात मृत झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 12 तासा पेक्षा जास्त वेळ वाट पहावी लागत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर हे गाव पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण वाढ होत असलेले हॉटस्पॉट गाव ठरत आहे. या गावात नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यविधीसाठी बारा तासांपेक्षा अधिक वेळ वाट पाहावी लागत आहे.
वाचा: VIDEO: बदलापूरात Lockdownवरुन मनसे आक्रमक; पालिका अधिकाऱ्यावर मनसे कार्यकर्ते गेले धावून
गुरुवारी सायंकाळी दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी सुरू असताना रात्री उशिरा आजून एक कोरोना बाधित आणि एक नैसर्गिक मृत्यू झालेल्या रुग्णाचा अंत्यविधी याठिकाणी करायचा होता परंतु आधीच दोन मृतदेह अंत्यविधीसाठी आलेले असताना या दोन मृतदेहांना अंत्यविधीसाठी आज दुपारपर्यंत वाट पाहावी लागली. यामुळे नैसर्गिक मृत्यू होऊनही अशी परिस्थिती असेल तर कोरोना बाधीत मृत्यू झाल्यानंतर किती वेळ वाट पहावी लागत असेल याचा विचार न केलेलाच बरा असे आता मृतांचे नातेवाईक सांगू लागले आहेत.
पुण्यातील कोरोना स्थिती आणि उपाययोजना
पुण्यात कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक आज पार पडली. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने सतर्ग रहावे. या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.