Pune Coronavirus: बुधवार पेठेतील रात्रीची गर्दी रोखण्यासाठी पोलीस सज्ज, गर्दी केल्यास कारवाईचा बडगा

Pune Coronavirus: बुधवार पेठेतील रात्रीची गर्दी रोखण्यासाठी पोलीस सज्ज, गर्दी केल्यास कारवाईचा बडगा

पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्येही पुण्यातील बुधवार पेठेत (Budhwar Peth) ग्राहकांची वर्दळ कायम आहे

  • Share this:

पुणे, 27 फेब्रुवारी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या कॅबिनेट बैठकीत हा कोरोनाविषयीची सद्यस्थिती सांगणारा रिपोर्ट सादर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाड्याबरोबरच पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. पुणे (Pune) एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट होते. आता पुन्हा एकदा शहरातील कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे सध्या पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्येही पुण्यातील बुधवार पेठेत (Budhwar Peth) मोठी वर्दळ असते. रात्रीच्या संचारबंदीमध्ये ही गर्दी कमी करण्यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत.  संचारबंदीच्या काळात या भागात फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली आहे.

या भागातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात आहे.  महिलांचे देखील पोलिसांकडून प्रबोधन केले जात आहे. या महिला देखील पोलिसांच्या आवाहानला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं लांडगे यांनी स्पष्ट केले.

( वाचा : राज्यात सलग तिसऱ्या दिवशीची कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक, अनेक जिल्ह्यांमध्ये Lockdown )

सध्या पुण्यात शाळा-महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आणखी पुढे शाळा-कॉलेज बंद ठेवायचे की नाही याबाबत आज निर्णय घेतला जाईल. जिल्हाधिकारी आणि पुणे तसंच पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांची याबाबत बैठक होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. पालकमंत्री पवार यांनी यासंदर्भात आदेश दिल्याचं ते म्हणाले.

Published by: News18 Desk
First published: February 27, 2021, 1:15 PM IST

ताज्या बातम्या