पुणेकरांनो सावधान! मुंबईच्या धारावीसारखे पुण्याच्या या भागात सापडताहेत सर्वाधिक रुग्ण

पुणेकरांनो सावधान! मुंबईच्या धारावीसारखे पुण्याच्या या भागात सापडताहेत सर्वाधिक रुग्ण

पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या गुरुवारी संध्याकाळी 442 झाली. तर मृतांचा आकडा 46 वर पोहोचला. यातले सर्वाधिक रुग्ण शहाराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या दोन प्रभागातले आहेत.

  • Share this:

पुणे, 16 एप्रिल : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणि त्याबरोबर कोरोनाबळीही वाढत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. ससून रुग्णालयात गुरुवारी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या गुरुवारी संध्याकाळी 442  झाली. तर मृतांचा आकडा 46 वर पोहोचला. यातले सर्वाधिक रुग्ण शहाराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या दोन वॉर्डमधले आहेत. हे दोन्ही प्रभाग गजबजलेल्या लोकवस्तीचे आहेत. त्यामुळे मुंबईत धारावीच्या हॉटस्पॉटमध्ये जो धोका आहे, तसाच पुण्याच्या या दोन भागात निर्माण झाला आहे.

या भागात आतापर्यंत 96 रुग्ण सापडले आहेत. मृतांमध्येसुद्धा याच भागातील अधिक नागरिक आहेत. त्या खालोखाल कसबा-विश्रामबागवाडा वॉर्डमध्ये 45 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. हे दोन्ही प्रभाग पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहेत. कडेकोट लॉकडाऊन आणि संचारबंदी करूनसुद्धा या भागातील रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

पाहा - IPS बायको कोरोनाशी लढतेय तर सध्या नवरा काय करतोय? SP पत्नीने शेअर केला VIDEO

पुणे शहरातील मृतांचा आकडा आता 46 वर पोहोचला आहे. आज मृत्युमुखी पडलेले दोन नागरिक गंजपेठ आणि कोंढवा भागातले रहिवासी होते. कोरोनाचा संसर्ग पुण्याच्या सर्व भागात पसरला आहे. पण पुणे महानगरपालिकेच्या दोन वॉर्डांमध्ये याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसतो. भवानी पेठ परिसर हा आता मुंबईच्या धारावीसारखा पुण्याच्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. भवानी पेठ 96, ढोले पाटील 46, कसबा विश्रामबागवाडा 45, शिवाजी नगर- घोले रोड 27, धनकवडी-सहकारनगर 26 या प्रभागांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. एकट्या ससूनमध्ये आतापर्यंत 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ससूनमधील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांचा टास्कफोर्स करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

पुणे महानगरपालिकेने दिलेला कोरोनाच्या संसर्गाचा वॉर्डनिहाय नकाशा

दरम्यान, पुण्यातील 16 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणखी 28 परिसर सील करण्यात आले. यामध्ये पुणे शहरातील जवळपास प्रत्येक भागातील अशा परिसरांचा समावेश आहे जिथे लोक अजूनही बाहेर फिरताना दिसत आहेत. पुण्यात याआधीच चार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाच परिसर सील करण्यात आले आहेत. आता आणखी 28 परिसर सील करण्यात आल्यामुळे लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. वानवडी, हडपसर, मुंढवा आणि कोंढवा या पोलीस परिमंडळातील आणखी परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याचा आता मोठा भाग सील झाला आहे.

अन्य बातम्या

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3202 वर, 300 रुग्ण बरे होऊन गेले घरी

6 महिन्यांच्या चिमुकल्यापासून 81 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा

कोरोनाच्या संकटात दिसला दानशूर महाराष्ट्राचा चेहरा; 15 दिवसात जमले 245 कोटी

First published: April 16, 2020, 10:05 PM IST

ताज्या बातम्या