पुण्यात Corona आटोक्यात का नाही? टेस्टिंगसाठी आता IAS अधिकारी नेमा - अजित पवार

पुण्यात Corona आटोक्यात का नाही? टेस्टिंगसाठी आता IAS अधिकारी नेमा - अजित पवार

कोविड कक्षामध्ये जात नसलेल्या डॉक्टरांवर, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, नवा IAS अधिकारी नेमा... अशा कडक शब्दांत पुण्यातल्या अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी सूचना केल्या.

  • Share this:

पुणे, 3 जुलै : टाळेबंदी (Lockdown) शिथिल झाली, म्हणजे आपली जबाबदारी संपली, असं होत नाही. पुण्यासारख्या शहरांत Coronavirus ची साथ आटोक्यात यायला काय अडचण आहे. मुंबईत नियंत्रणात येते, तर पुण्यात का नाही? काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करा, अशा कडक शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा दिला. पुण्यात COVID चाचण्या पुरेशा प्रमाणात व्हाव्यात म्हणून पुण्यासाठी 'टेस्टींग इन्चार्ज' IAS अधिकारी नेमण्याची सूचनाही पवार यांनी केली.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी 'टेस्टींग इन्चार्ज' म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत दिले.

बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, तसंच जिल्हापरिषदेचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

COVID-19चा धोका वाढल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा Lockdownचा निर्णय

या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत इशारा देताना अजित पवार यांनी Corona विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करायला सांगितलं.

पवार म्हणाले, "कोविड रुग्णांवर उपचार करतांना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये. काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करा. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होतांना दिसून येत आहे. ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा. त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतांना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या करीता आवश्यक ती कार्यवाही करावी, असं आवाहनही पवार यांनी केले.

मुंबई, पुण्यासह 6 जिल्ह्यांना RED Alert; शनिवारी अतिवृष्टीचा इशारा

अजोय मेहता यांनी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमूणक करतांना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करण्याची सूचना केली. 'ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी 'कम्युनिटी लिडर्स'ची मदत घ्या. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, या गोष्टी करताना प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा, कोरोना बाधित रुग्ण तात्काळ शोधण्यासाठी आरोग्य पहाण्यांचे, चाचण्यांचे प्रमाण वाढवा, त्यांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर प्राप्त करा, जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तात्काळ तपासणी करा, कोरोना बाधित रुग्णावर तात्काळ वर्गवारीनुसार उपचार सुरु करा, आरोग्य सेतू ॲप मधील माहितीचा प्रभावीपणे वापर करा, यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राची मदत घ्या. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊन कालावधीत शासनाच्या निर्देशाची कडक अमंलबजावणी करा', अशा सूचना त्यांनी केल्या.

संकलन - अरुंधती

First published: July 3, 2020, 8:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading