पुण्यात एका निर्णयामुळे बदललं चित्र, तब्बल 8 कोव्हिड केअर सेंटर महापालिकेनं केली बंद

पुण्यात एका निर्णयामुळे बदललं चित्र, तब्बल 8 कोव्हिड केअर सेंटर महापालिकेनं केली बंद

पुणे महापालिकेने 8 कोव्हिड केअर सेंटर तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

पुणे, 13 ऑगस्ट : कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय देण्याच्या निर्णयानंतर शहरातील कोव्हिड केअर सेंटरमधील चित्र बदललं आहे. कोरोना संसर्ग झालेले बहुतांशी रूग्ण हे 'होम आयसोलेशन' चा पर्याय स्वीकारत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेने 8 कोव्हिड केअर सेंटर तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना रुग्ण होम आयसोलेट होत असल्याने महापालिकेची बहुतांशी कोव्हिड केअर सेंटर रिक्त झाली आहेत. यामुळे पुणे महापालिकेने 8 कोव्हिड केअर सेंटर काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. शहरातील 21 कोव्हिड केअर सेंटरपैकी बहुतांशी ठिकाणी 50 टक्केच कोव्हिडचे रूग्ण असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी सेंटरच्या एकूण क्षमतेच्या पाच दहा टक्केही रूग्ण नाहीत. त्यामुळे महापालिकेकडून काही कोव्हिड सेंटर बंद करण्यात आली.

महानगरपालिकेने बंद केलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये प्रामुख्याने सिंहगड कॉलेजची एक पूर्ण बिल्डिींग, संत ज्ञानेश्वर हॉस्टेल यांचा समावेश आहे.पुणे महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात 21ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे केले होते. त्यामध्ये साधारणत: 12 हजार बेडची क्षमता आहे.

पुण्यात काय आहे कोरोनाची स्थिती?

पुणे शहरात बुधवारी नव्याने 1 हजार 584 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 69 हजार 235 झाली आहे. तर 1 हजार 449 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 14 हजार 812 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काल कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील एकूण तपासणी आता 3 लाख 36 हजार 254 झाली असून आज 6 हजार 213 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या.

Published by: Akshay Shitole
First published: August 13, 2020, 9:07 AM IST

ताज्या बातम्या