कोरोनाचा उद्रेक वाढल्याने मंगळवारपासून पुण्याचं पूर्ण मार्केट बंद राहणार

कोरोनाचा उद्रेक वाढल्याने मंगळवारपासून पुण्याचं पूर्ण मार्केट बंद राहणार

  • Share this:

पुणे 17 मे : कोरोनाचा उद्रेक पुण्यात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुणे गुलटेकडी मार्केटमधील भुसार विभागही बंद होणार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून हे मार्केट काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याच्या पूर्ण बाजारपेठेवरच त्याचा परिणाम होणार आहे. काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

मंगळवारपासून भुसारविभागही बंद ठेवण्याचा निर्णय पुणे मर्चंट चेंबर्सने घेतला होता. खरेदीदारांनी भीतीपोटी मार्केटमध्ये गर्दी करू नये असं आवाहन मार्केट कमिटी प्रशासक बी. जी देशमुख यांनी केलं आहे.

भाजी मार्केटचे सध्या फक्त उपबाजार सुरू आहेत. पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड रेड झोनमध्ये असल्याने तेही सध्या बंद आहेत. लोक गर्दी करत नियमांचं पालन करत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही प्रशासक देशमुख यांनी दिलंय.

कोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप

लॉकडाऊन 3.0 संपायला आता केवळ १ दिवस राहिला आहे. सोमवारपासून 4.0 सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन 4.0चे संकेत दिले होते. मात्र हा लॉकडाऊन पूर्णपणे वेगळा असेल असंही त्यांनी सांगितलं होतं. हा लॉकडाऊनही 15 दिवसांचा असणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

या लॉकडाऊनमध्ये अनेक सुविधा दिल्या जाऊ शकतात. उद्योग सुरू करण्याबाबात आणखी सुट मिळू शकते. त्याच बरोबर सार्वजनिक वाहतूक आणि कॅबलाही परवानगी मिळू शकते. शाळा कॉलेजेस आणि इतर शैक्षणिक संस्था मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

... आणि पायी चालत जात राहुल गांधी यांनी घेतली मजुरांची भेट

मॉल्स, हॉटेल्स आणि बाजारही बंदच राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच सुट राहणार आहे. नवा लॉकडाऊन कसा असावा याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिवसभर अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या.

 

First published: May 18, 2020, 4:03 PM IST

ताज्या बातम्या