पुणेकरांसाठी लॉकडाऊनमध्ये 3 महत्त्वाच्या सूचना, कोरोनाला हरवण्यात होईल मदत

पुणेकरांसाठी लॉकडाऊनमध्ये 3 महत्त्वाच्या सूचना, कोरोनाला हरवण्यात होईल मदत

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर पाऊल प्रशासनाकडून उचलण्यात आलं आहे.

  • Share this:

पुणे, 12 जुलै : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊनची (Pune Lockdown) घोषणा करण्यात आली असून 13 जुलैपासून पुढील 5 दिवस केवळ दवाखाने,दूध आणि औषधाची दुकाने खुली असणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे कठोर पाऊल प्रशासनाकडून उचलण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे येथे कोरोनाचा जास्त प्रभाव झालेला आहे. यामुळे शासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक डॉ.रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.

पुणेकरांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1. शासनाने घेतलेल्या या लॉकडाऊन कालावधीत प्रत्येकाने हात स्वच्छ धुऊन मास्कचा वापर करावा.

2. लॉकडाऊन मोडणार नाही याची काळजी घ्यावी.

3. घरातील कुठल्याही व्यक्तीला ताप व श्वसनाचा त्रास झाला तर पुढे येऊन तपासणी केली पाहिजे. प्रत्येक डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी हे आपल्यासाठी सेवा देत आहेत. यासाठी प्रत्येकाने साथ देवून पुढाकार घेऊन स्वत:ला 'कोरोना योध्दे' समजून हा लॉकडाऊन यशस्वी करावा, असं आवाहन उपसंचालक डॉ.गंगाखेडकर यांनी केले.

दरम्यान, पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: July 12, 2020, 2:10 PM IST

ताज्या बातम्या