Home /News /pune /

Coronavirus वाढला; राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर, मुंबई आणि ठाण्यातही आढळले रुग्ण

Coronavirus वाढला; राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर, मुंबई आणि ठाण्यातही आढळले रुग्ण

पुण्यात Covid- 19 रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 झाली आहे आणि अनेक भागात संशयित रुग्णही सापडले आहेत.

    पुणे, 12 मार्च: कोरोना व्हायरस (Coronavirus) चा धोका वाढला आहे. मुंबई आणि ठाण्यात एक-एक रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण पुणे येथील असून या 33 वर्षीय पुरुषाने अमेरिकेला प्रवास केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील 35 वर्षीय तरुण तसेच हिंदूजा येथे भरती असलेला आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला 64 वर्षाचा पुरुष रुग्ण आज प्रयोगशाळेत तपासणीत कोरोना बाधित आढळले. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 14 झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. सर्व कोरोना बाधित रुग्णाच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु आहे. आज राज्यात एकूण 50 नवीन संशयित भरती झाले आहेत. पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या 9 झाली आहे. महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या 14 झाली आहे. दुबईहून आलेल्या एका दांपत्याला पुण्यात प्रथम कोरोना व्हायरस असल्याचं उघड झालं. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाले. आज सापडलेला रुग्ण अमेरिकेहून नुकताच पुण्यात आल्याचं उघड झालं आहे. महाराष्ट्रात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक अमेरिकेहून परत आला होता. त्याची तपासणी 11  मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 9 वर गेली आहे. पुण्याच्या या रुग्णांखेरीज मुंबईत 2 आणि नागपूरमध्ये 1 रुग्ण कोरोनाबाधित आहे. याशिवाय संशयित रुग्णांची संख्या राज्यभरात वाढली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संशयित आढळले आहेत. त्यांच्यात लक्षणं दिसल्यामुळे आणि परदेशातला प्रवास लक्षात घेऊन त्यांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी त्यांचे स्वॅब लॅबमध्ये देण्यात आले आहेत. या सर्व संशयितांचे रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत. वाचा - कोरोनाची धास्ती! मोदी सरकारच्या प्रतिक्रियेनं IPL चा सस्पेन्स वाढला, काय होणार? भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 60 पर्यंत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा दिल्ली राज्य सरकारने शाळा, मॉल आणि चित्रपटगृहं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहं आणि मॉल 31 मार्चपर्यंत बंद राहतील. शाळा आणि कॉलेजेसना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. अशी घ्या काळजी कोरोनामुळे खबरदारी घेणं गरजेचं आहे. शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं आणि आपली काळजी आपण घेणं आवश्यक आहे. हात वारंवार साबणानं धुवा. कोरोना आणि मांसाहार यांचा थेट संबंध नसला तरीही अर्धवट शिजलेलं आणि कच्चं मांस खाणं टाळा. फळे, भाज्या न धुता खाऊ नका. देशात कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. यामुळे IPL 2020 वरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. स्पर्धा आयोजित करण्याच्या बाजूने सरकार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सध्याचे सर्व व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द केले आहेत. अन्य बातम्या शरद पवारांपेक्षा 5 पट श्रीमंत आहेत सुप्रिया सुळे, इतक्या कोटींची आहे संपत्ती बंडखोर आमदार असलेल्या रिसॉर्टमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! पाहा VIDEO
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या