...तर ठाणे, नवी मुंबईसारखं पुणंही होणार ठप्प; कडक लॉकडाऊनचा इशारा

...तर ठाणे, नवी मुंबईसारखं पुणंही होणार ठप्प; कडक लॉकडाऊनचा इशारा

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. नेमका काय आहे पुण्यासाठी नवा आदेश?

  • Share this:

पुणे, 6 जुलै : शासनाने लॉकडाऊन (Lockdown) शिथिल केला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचा (Lockdown) धोका टळलेला नाही. नागिराकांनी नियम पाळले नाहीत ठाणे आणि नवी मुंबईप्रमाणेच पुणे शहरातदेखील कडक लॉकडाऊन जारी करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसंच ग्रामीण भागात अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचं निदर्शनास येत आह, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा थेट इशारा इशारा नवल किशोर राम यांनी दिला आहे.

संजय राऊतांच्या गुगलीवर पवारांचे षटकार, दोन्ही नेत्यांमध्ये रंगणार ‘सामना'

जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 20 दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितले.

मुंबईच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची समज, बदल्यांवरून झाला होता वाद

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जनजागृतीवर भर दिला जाणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, ग्रामीण भागात नागरीकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लग्नसमारंभात दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी होताना दिसून येत आहे. त्यादृष्टीने भरारी पथके तयार करण्यात आली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 6, 2020, 10:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading