पुण्यात 10 दिवसाच्या कडक लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम...असं बदललं शहरातील चित्र

अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

पुण्यात जुलैमधील 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे आत्ता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

  • Share this:
पुणे, 6 ऑगस्ट : पुणे शहरात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी कडक लॉकडाऊन (Pune Lockdown) करण्यात आला. मात्र लॉकडाऊन काळातही कोरोना रुग्णांमध्ये (Coronavirus) वाढ होत होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या परिणामकारकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. मात्र पुण्यात जुलैमधील 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे आत्ता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. पुणे शहरात दैनंदिन रूग्णवाढीची संख्या 2 हजारांवरून थेट निम्म्याने कमी झाली आहे, मृत्यूदरातही 2.3 पर्यंत घट झाली आहे. खासगी हॉस्पिटलच्या तब्बल 280 बिलांमध्ये अनियमिता आढळून आली असून संबंधित हॉस्पिटल्सवर चौकशीअंती कारवाई होणार आहे. पुण्यात गेल्या चार दिवसांची कोरोना रुग्णांच्या आलेखावर नजर टाकली तर रूग्णवाढीची संख्या थेट निम्याने घटल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे टेस्टिंगमध्ये कुठेही कपात करण्यात आलेली नाही. तरीही दैनंदिन रूग्णवाढ आणि डिस्चार्जच्या संख्येत सकारात्मक तफावत दिसून येत आहे. पुण्यात कोरोना आटोक्यात? - रुग्ण बरे होण्याचा दर - 70टक्के - मृत्यूदरातही 4 टक्क्यांवरून 2.3 टक्क्यांपर्यंत घट - रूग्णवाढीचा दर 24 टक्क्यांवरून 18 टक्के - रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 17 दिवसांवरून 30 दिवसांवर घसरला - दैनंदिन रूग्णवाढ 2 हजारांवरून 1 हजारांवर घसरली - पहिल्यांदाच डिस्चार्जची संख्या रूग्णवाढीपेक्षा अधिक - पुण्यात आत्तापर्यंत 3 लाख कोरोना चाचण्या पुण्यात डिस्चार्जची संख्या अचानक वाढण्याला खासगी हॉस्पिटलच्या आकडेवारीचा घोळच कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्याचीही चौकशी केली जाणार असल्याचं स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुणे मनपाला खासगी हॉस्पिटल्सच्या तब्बल 280 बिलांमध्ये अनियमितता आढळून आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी न्यूज 18 लोकमतला दिली. लॉकडाऊनमुळे पुण्यात साथ नियंत्रित झाल्याचं भासत असलं तरी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणखी स्पाईक येण्याची भीती प्रशासनाला सतावत आहे. त्यामुळे पुणेकरांनो काळजी घ्या... कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, असं आवाहन करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published: