‘पार्थ पवारचा बाप सांगतोय तो सिंगापूरला चार महिने झाले गेलाच नाही’

‘पार्थ पवारचा बाप सांगतोय तो सिंगापूरला चार महिने झाले गेलाच नाही’

'सगळी माहिती खोटी आहे. पाहिजे तर पार्थचा पासपोर्ट दाखवतो.'

  • Share this:

पुणे 20 मार्च : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोनावर पत्रकार परिषद घेतली. पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त तातडीच्या सेवा पुरवणाऱ्यांसाठी सुरू ठेवलं असून आता जर कुणी ऐकणार नसतील तर फक्त कर्मचाऱ्यांसाठीच त्यांना मर्यादीत ठेवून बाकी सगळं बंद कराव लागेल असा इशारा त्यांनी दिला. पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हा, मुंबई पुण्यात आणि पिंपरीत हाच निर्णय घेतला जाऊ शकतो. कामगारांचा पगार कापू नका, तातडीच्या गरजेच्या वस्तू विकणारे, भाजीवाले यांना सूट देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून WhatsAppवर फिरणाऱ्या पार्थ पवारांविषयीच्या माहितीवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार म्हणाले, सगळी माहिती खोटी आहे. पार्थ पवारचा बाप सांगतोय की तो सिंगापूरला चार महिने झाले गेलाच नाहीय. पाहिजे तर त्याचा पासपोर्ट दाखवतो असंही ते म्हणाले. पार्थ हा सिंगापूरमध्ये अडकून पडला आहे आणि त्याच्या सुटकेसाठी विशेष विमान पाठविण्यात आलं होतं असा मेसेज WhatsAppवर व्हायरल झाला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.

आणखी काय म्हणाले पवार?

निधीची अडचण कुणालाच येऊ देणार नाही. पेशंटने पण डॉक्टरांचं ऐकावं आणि लवकर बरं व्हावं. आरोग्यमंत्र्यांच काम कौतुकास्पद, चांगल्याला चांगलं म्हणावं. मुख्यमंत्री आणि आमचे आरोग्यमंत्री सतत माध्यमांशी बोलताहेत.

युरोपात कहर! Coronavirus ने चीनपेक्षाही इटलीत घेतले जास्त बळी

आजच्या घडीला ५२ रूग्ण आहेत. पंतप्रधान, देशाचे आरोग्यमंत्री सगळेच सूचना देताहेत.गर्दी टाळायच्या सूचना आहेत. सर्वांनी स्वत:पासून सुरूवात करा. ज्या सूचना करायच्या आहेत. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या जातील.

नवीन सुधारित निर्णय घेतलाय, यापूर्वीचे आदेश 31 मार्च पर्यंत होते ते आता पुढचे आदेश निघेपर्यंत हे आदेश लागू राहतील. लग्न समारंभ, दहावे, तेराव्याला गर्दी टाळा, लग्न करण फारच गरजेच असेल तर कमी गर्दीत लग्न लावा.

कनिका कपूरमुळे भाजपच्या या माजी मुख्यमंत्र्यांना व्हावं लागलं क्वारंटाइन

ग्रामीण भागात होमगार्डस ची नेमणूक करू. सतत काम करणाऱ्या डॉक्टर्स नर्सेसला सुट्टीची गरज, विश्रांतीची गरज आहे. पोलिसांची ही तीच परिस्थिती. त्यामुळे गरज असेल तिथे होमगार्डची नेमणूक करू. सूचना हलक्यात घेऊ नका असंही ते म्हणाले.

 

First published: March 20, 2020, 6:29 PM IST

ताज्या बातम्या