'कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुंबईनं केलेल्या या चुका पुण्यानं टाळाव्यात अन्यथा...'

'कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुंबईनं केलेल्या या चुका पुण्यानं टाळाव्यात अन्यथा...'

राज्यातील दोन सर्वात मोठी शहरं म्हणजे मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. दोन्ही शहरांमध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.

  • Share this:

पुणे, 07 जुलै : देशात कोरोनाचा (coronavirus) कहर सुरूच आहे. यात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत ते महाराष्ट्र राज्यात. राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा हा आता 2 लाखांहून जास्त आहे. राज्यातील दोन सर्वात मोठी शहरं म्हणजे मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. दोन्ही शहरांमध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मुंबईतील काही भागांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. अशी परिस्थिती येत्या काही दिवसांत पुण्यातही पाहायला मिळू शकते.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 84 हजाराहून अधिक आहे तर, दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे. पुण्यात 21 हजाराहून अधिक रुग्ण आहेत. यावरून मुंबईपेक्षा पुण्याची स्थिती बरी असल्याचे चित्र दिसत असले तरी, मुंबईने कोरोनाविरुद्ध लढईत केलेल्या चुका पुणे करत आहे. आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी हिंदूस्थान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात या गोष्टींचा उल्लेख केला आहे. डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते मुंबईत चाचणी प्रमाण कमी होते, त्यामुळं रुग्णांची संख्या जास्त आहे. एवढेच नाही तर जे नागरिक स्वत: समोर येऊन चाचणी करण्यास तयार आहेत, त्यांच्याकडे डॉक्टर आणि प्रशासन लक्ष देत नाही आहे, हा असाच प्रकार पुण्यातही होत आहे.

वाचा-पुणे महापालिकेचे अधिकारीच गॅसवर, महापौरांना कोरोना झाल्यामुळे खळबळ

पुण्यातील सर्वात मोठा चिंता आहे ती म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच संपर्कातून होणारा प्रसार. याचे कारण म्हणजे पॉझिटिव्ह रुग्ण आपली माहिती किंवा इतर तपशील नीट देत नाही. त्यामुळं पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे कठिण जाते. असाच प्रकार मुंबईत घडला, ज्याचे परिणाम वाईट झाले.

दुसरीकडे आणखी एक समस्या म्हणजे कडक लॉकडाऊन. पुणे शहर तसंच ग्रामीण भागात अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचं निदर्शनास येत असतात. त्यामुळं शहरात लॉकडाऊन जाहीर करण्याची तयारी जिल्हाधिकारी करत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा थेट इशारा इशारा सोमवारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

वाचा-...तर ठाणे, नवी मुंबईसारखं पुणंही होणार ठप्प; कडक लॉकडाऊनचा इशारा

'20 दिवस ठरले घातक'

जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 20 दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितले.

सोमवारची आकडेवारी

मुंबईत सोमवारी 1200 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 85 हजार 724 एवढी झाली. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 268 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 10 जार 999 झाली आहे.पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. पुण्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण (Pune mayor murlidhar mohol covid-19 positive) झाली होती. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे.

वाचा-पुणे जिल्ह्यात कोरोनाला निमंत्रण देणारा धक्कादायक प्रकार, मोठी गर्दी

संपादन-प्रियांका गावडे.

Published by: Manoj Khandekar
First published: July 7, 2020, 8:45 AM IST

ताज्या बातम्या