Home /News /pune /

पुण्यात कोरोना प्रतिबंधासाठी आता नवा प्लॅन; असे असतील नवे नियम

पुण्यात कोरोना प्रतिबंधासाठी आता नवा प्लॅन; असे असतील नवे नियम

पुण्यात लॉकडाऊन आणि प्रतिबंधित क्षेत्रांच्या निर्मितीनंतरही रुग्णवाढीचा वेग कायम आहे. पण चौथ्या लॉकडाऊनमध्ये किमान काही व्यवहार सुरळित करणं अनिवार्य होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आता नवा प्लॅन तयार केला आहे.

पुढे वाचा ...
पुणे, 19 मे : पुण्यात लॉकडाऊन आणि प्रतिबंधित क्षेत्रांच्या निर्मितीनंतरही रुग्णवाढीचा वेग कायम आहे. पण चौथ्या लॉकडाऊनमध्ये किमान काही व्यवहार सुरळित करणं अनिवार्य होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आता नवा प्लॅन तयार केला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन (Micro Containment zone) घोषित करून तिथे लॉकडाऊनचे कडक नियम लागू करून अन्य भागात दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरू करण्याचा विचार आहे. पुण्यात आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3747 झाली आहे आतापर्यंत 207 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 1920 जणांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णसंख्या वाढते आहे. अन्य भागात तुलनेने ही साथ आटोक्यात आहे. सगळ्यांसाठी 1 जून पासून सुरू होणार ट्रेन्स, दररोज धावणार 200 गाड्या त्यामुळे नव्या नियमांनुसार, छोट्या प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम कडक असतील, तर इतरत्र व्यवहारांना सुरुवात करण्यास परवानगी देण्यात येईल. असे असतील नवे नियम पुणे परिसरात आता मायक्रो कंटेन्मेंट झोनसाठी प्रतिबंधांची नियमावली करण्यात येत आहे.या क्षेत्रांमध्ये रुग्ण जास्त असल्याने व्यवहार सुरू होणार नाहीत. मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ जीवनावश्यक सुविधा सुरू राहणार. यामध्ये दूध, किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने, दवाखाने, स्वयंपाकाचा गॅस या व्यतिरिक्त इतर सुविधांना परवानगी नाही. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर (कंटेन्मेंट  झोन ) घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (मोलकरीण ) मालकाची तयारी असेल तर परवानगी. मात्र डोमेस्टिक हेल्प करणारी व्यक्ती ही प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असावी. 31 तारखेपर्यंतच्या लाॅकडाऊनसाठी नवी नियमावली तयार करण्यात येईल. सर्व दुकानांना ठरवेल्या वारी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण प्रतिबंधित क्षेत्रात मात्र परवानगी नसेल. पथारी व्यावसायिकांनाही ठराविक रस्ते वगळता व्यवसाय करता येणार आहे, असं समजतं. आरोग्यमंत्र्यांचे रुग्णवाढीचे संकेत कोरोनाची स्थिती सरकारच्या ताब्यात आहे. १ लाख बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. मात्र असं असलं तरी घाबरण्याचे कारण नाही. सरकारी हॉस्पिटल्समधली 80 टक्के बेड्स सरकारने ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी आज दिली. मृत्यूदर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे दिर्घकाळ चालणारं संकट असल्याने लोकांनी घाबरून चालणार नाही. धीराने आणि धैर्याने त्यांनी मुकाबला केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षाही रद्द होणार? UGC ला राज्याकडून पत्र मुंबईत आतापर्यंत 800 मृत्यू, रुग्णसंख्या 22583; पुण्यातही रुग्ण वाढले धक्कादायक: ठाण्यातल्या कोरोना योद्ध्यांना 3 महिन्यांपासून पगारच नाही
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या