कोरोना संकटातच पुण्यात प्रशासनाची डोकेदुखी वाढली, एका हॉटेलचे बील 86 लाख 72 हजार रुपये

कोरोना संकटातच पुण्यात प्रशासनाची डोकेदुखी वाढली, एका हॉटेलचे बील 86 लाख 72 हजार रुपये

जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता शेकडो डॉक्टर्स, नर्स अहोरात्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहे.

  • Share this:

पुणे, 15 जून : गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता शेकडो डॉक्टर्स, नर्स अहोरात्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहे. या सरकारी आणि खासगी डॉक्टर, नर्सची प्रशासनाने रुग्णालयांच्या लगत असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे. परंतु संबंधित हॉटेल मालकांनी यासाठी प्रशासनाला प्रति व्यक्ती प्रति दिनासाठी तब्बल 2 हजार रुपयांचा दर लावला आहे.

एका हॉटेलने तब्बल 86 लाख 71 हजार रुपयांचे बील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले असून, बिलाचे पैसे मिळण्यासाठी वारंवार विचारणा केली जात आहे. परंतु सध्या जिल्हा आपत्ती प्रतिसाद  खात्यामध्ये असलेला निधी इतर अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्च झाला असून, आता हॉटेलची कोट्यवधी रुपयांची बीले कसे द्यायचे अशा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टर आणि नर्सच्या कुटुंबीयांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर या खासगी डॉक्टरांनी आपली हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. त्यानुसार सुरुवातील प्रशासनाने केवळ या नामांकित डॉक्टरची पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय करण्यात आली.

त्यानंतर प्रशासनाने ससून रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ, निवासी डॉक्टरांसह कोरोनाची ड्युटी करणाऱ्या नर्सची देखील हॉटेलमध्ये सोई केली. सध्या एकूण सुमारे 500 ते 600 सरकारी व खाजगी डॉक्टर, नर्स यांची शहरातील काही हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. यात पुणे शहरातील हॉटेल पवन, लेमन ट्री, आर्शिवाद हॉटेल, पंचरत्न, हॉटेल सागर ही हॉटेल अधिग्रहण करुन येथे ससून हॉस्पीटलसह सुमारे 80 खजगी डॉक्टरची निवासाची सोय करण्यात आली आहे.

त्यापैकी एका हॉटेलनेच 86 लाख 71 हजार रुपयांचे बील जिल्हा प्रशासनाला सादर केले. त्यापैकी 33 लाख 52 हजार रुपयांचे बील सीएसआर निधीद्वारे आदा करण्यात आले. परंतु आता शिल्लक 53 लाख 18 हजार रुपयांसाठी संबंधित हॉटेल मालकांकडून वारंवार प्रशासनाकडे तगादा लावला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 15, 2020, 11:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading