मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

लॉकडाऊनमध्ये आईला गर्भवती मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे पोलिसांनी अशी केली मदत

लॉकडाऊनमध्ये आईला गर्भवती मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे पोलिसांनी अशी केली मदत

महिन्यांची गर्भवती महिलेच्या प्रसूतीची तारीख जवळ आली होती. असं असताना आईला लातूरहून मुलीच्या देखभालीसाठी पुण्याला यायचं होतं. पण येण्यासाठी कोणतंही वाहन उपलब्ध नव्हतं.

  • Published by:  Kranti Kanetkar
पुणे, 05 एप्रिल : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याच परिस्थितीमध्ये अंध असलेल्या 9 महिन्यांची गर्भवती महिलेच्या प्रसूतीची तारीख जवळ आली होती. असं असताना आईला लातूरहून मुलीच्या देखभालीसाठी पुण्याला यायचं होतं. पण येण्यासाठी कोणतंही वाहन उपलब्ध नव्हतं. त्यामुळे आई लातूरमध्येच होती. सोशल मीडियावर पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना दिलेले अनेक शिक्षा दिल्याचे व्हिडीओ फिरत आहेत. य महासंकटात कठीण प्रसंगात पुणे पोलीस पुन्हा एकदा मदतीसाठी धावून आल्याचं पाहायला मिळालं. पुण्याचे पोलीस नाईक दाऊद सय्यद यांनी अंध असलेल्या सपना नवले यांच्या आईला लातूरहून पुण्याला आपल्यासोबत आणलं. मिळालेल्या महितीनुसार नवले दाम्पत्य बँकेत कामाला आहे. सपना नवले 9 महिन्यांच्या गर्भवती आहेत. प्रसूतीचे दिवस भरले असून त्यांची काळजी घेण्यासाठी कुणी बाईमाणूस नाही. त्यांची आई लातूरमध्ये राहत होती. पुणे पोलिसांना या समस्येची माहिती मिळताच देवमाणसासारखे मदतीला धावून आले. पोलीस नाईकानं आपल्यासोबत आईला आणलं आणि नवले दाम्पत्याकडे सुखरुप सोडलं. हे वाचा-फळांवर थुंकी लावून विकणाऱ्याचा VIDEO व्हायरल, पोलिसांनी केली कडक कारवाई 'आम्ही दोघंही अंध असल्यानं मला या दिवसांमध्ये आईची गरज होती. पुणे पोलिसांनी माझी अडचण समजून घेतली आणि आईला ते घेऊन आले त्यांचे मनापासून आभार मानावेत तेव्हडे थोडे आहे.' पोलीस नाईक लातूर इथे सुट्टीसाठी गेले होते. 03 एप्रिल रोजी ते पुन्हा पुण्यात कामावर रुजू होणार होते. त्यावेळी आपल्यासोबत त्यांनी या नेत्रहीन असलेल्या सपना नवले यांच्या आईला आपल्यासोबत पुण्याला आणलं. नेत्रहीन सपना यांना केलेल्या मदतीनंतर सोशल मीडियावरही युझर्सकडून पुणे पोलिसांचं खूप कौतुक होत आहे. हे वाचा-अस्सलाम अलैकुम! 'आम्हाला तुमचा अभिमान', पाकने केले Air Indiaचे कौतुक
First published:

Tags: Coronavirus, Pune police

पुढील बातम्या