Home /News /pune /

पुण्याच्या परिस्थितीवर केंद्रीय पथकाने व्यक्त केली चिंता; हे आहे कारण

पुण्याच्या परिस्थितीवर केंद्रीय पथकाने व्यक्त केली चिंता; हे आहे कारण

पुण्यात 39 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात 8 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहे.

पुण्यात 39 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात 8 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात ज्या भागात अधिक आहे, तिथे केंद्रीय पथक पाहणीसाठी जात आहे. ही IMCT टीम पुण्याच्या दौऱ्याहून परतल्यानंतर त्यांनी परिस्थितीबद्दल शंका व्यक्त केली आहे.

    पुणे, 27 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात ज्या भागात अधिक आहे, तिथे केंद्रीय पथक पाहणीसाठी जात आहे. ही Inter-Ministerial Central Team (IMCT) पुण्याच्या दौऱ्याहून परतल्यानंतर त्यांनी परिस्थितीबद्दल शंका व्यक्त केली आहे. देशात कोरोनारुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीच्या वेगापेक्षा पुण्याचा वेग खूप जास्त असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे. रुग्ण दुप्पट व्हायचा दर पुण्यात 7 दिवसांवर आला आहे. देशात रुग्णसंख्या दुप्पट व्हायला अधिक दिवस लागत आहेत. पुण्यात चाचणी झालेल्या 9 सँपल्समध्ये 1 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहे. देशात हे प्रमाण बरंच जास्त - म्हणजे 23 चाचण्यांमागे एक पॉझिटिव्ह एवढं आहे. केंद्रीय पथकाच्या या नोंदींमुळे शहराच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाघितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या 606 वरुन थेट 1319 वर पोहोचली आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी 100 रुग्ण आढळून येत आहे. रुग्णसंख्या दुप्पट व्हायचा वेग पुण्यात 7 दिवसांवर आला आहे.  हा वेग देशात बराच कमी आहे. देशातल्या 18 राज्यांमध्ये हा रुग्ण दुप्पट व्हायचा दर 8 दिवसांपेक्षा अधिक आहे. पुण्यात मृत्यूदरही देशाच्या सरासरीपेक्षा बराच जास्त आहे. संबंधित - पुण्यात धोका वाढला : कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये आता योजणार हा शेवटचा उपाय 27 एप्रिल रोजी राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे शहरात 969 कोरोनारुग्ण आहेत. आतापर्यंत शहरात 74 बळी गेले आहेत. राष्ट्रीय सरासरीपेक्षा हा मृत्यूदर अधिक आहे. 7 टक्के रुग्ण दगावत आहेत, असा याचा अर्थ. देशात हे प्रमाण 3 टक्क्यांच्या आसपास आहे. वाचा - मुंबईत लपलेल्या 11 तबलिगींच्या मुसक्या आवळल्या, धक्कादायक माहिती आली समोर दिवसभऱात पुण्यात 78 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आणि दिवसभरात 3 मृत्यू नोंदले गेले. 49 रुग्णांची तब्येत चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यात या आठवड्यात आढळलेल्या रुग्णांची संख्या सोमवार (20 एप्रिल)- 80 मंगळवार (21 एप्रिल)- 42 बुधवार (22 एप्रिल)- 66 गुरुवार (23 एप्रिल)- 104 शुक्रवार (24 एप्रिल)- 104 शनिवार (25 एप्रिल)- 90 लॉकडाऊनच्या काळात निर्बंध अधिक कठोर केल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पाहाणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानेही चिंता केली आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून अतिसंक्रमित भागातून नागरिकांना हलवण्याचा उपाय पुणे महापालिका योजत आहे. अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरतं स्थलांतरित करण्याची महापालिकेची योजना असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात 20000 आणि नंतर 70000 लोकांचं स्थलांतर होऊ शकतं. पुण्यात सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ, कसबा पेठ, ढोले पाटील रस्ता या वॉर्डात झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली दाटीवाटीची वस्ती, छोटी घरं यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून कासेवाडी आणि इतर काही झोपडपट्टा भागात कोरोनाचे अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशा हॉटस्पॉट्समधून नागरिकांचं स्थलांतर करण्याचा उपाय पालिका करणार आहे.तात्पुरत्या क्वारंटाइन सेंटरमध्ये त्यांची सोय करण्याची महापालिकेची तयारी आहे. अन्य बातम्या ना मृत्यू, ना कोमा; तर किम जोंग 'या' कारणामुळे झालेत अंडरग्राउंड कोरोनाविरोधातील लढा आपण जिंकणारच! 8 महिन्यांची गर्भवतीही रणांगणात
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या