पुणेकरांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 28 परिसर सील

पुणेकरांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 28 परिसर सील

अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनला गांभीर्यानं घेतलं जात नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये कठोर पावलं उचलली जात आहेत.

  • Share this:

पुणे, 15 एप्रिल : देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 दिवस म्हणजेच 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार आवाहन करूनही अजूनही अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनला गांभीर्यानं घेतलं जात नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये कठोर पावलं उचलली जाणार आहेत. पुण्यातील 16 पोलिस स्थानकाच्या हद्दीतील आणखी 28 परिसर बुधवारी सकाळपासून सील करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असून मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या आरोग्यासाठी पोलीस आणि प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यात या आधीच 4 पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पाच परिसर सील करण्यात आले होते. आता आणखी 28 परिसर सील करण्यात येणार असल्यामुळे लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. सोमवारी महापालिका आयुक्तांनी पुण्यातील काही परिसर सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे दिला होता. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावामधे आणखी काही परिसरांची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. त्यानुसार बुधवारपासून हे परिसर सील करण्यात येणार आहे. या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

हे वाचा-Coronavirus पासून बचावासाठी महत्त्वाचं सोशल डिस्टेसिंग; किती असावं सुरक्षित अंतर

महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2684 वर पोहोचली आहे. दुसरीकडे चांगली बाब म्हणजे आतापर्यंत राज्यातील 259 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सध्या राज्यातील 2247 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या 46 हजार 588 नमुन्यांपैकी 42 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 2684 जणं पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 178 झाली आहे.

सध्या राज्यात 67 हजार 701 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून 5647 जणं संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे.

हे वाचा-ATMमधून पैसे नाही तर येणार तांदूळ, लॉकडाऊनमध्ये 'या' देशाने अशी केली सोय

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 15, 2020, 8:00 AM IST

ताज्या बातम्या