काळजाचा तुकडा मृत्यूशी झुंज देतोय आणि तरीही पोलीस बाप बजावतोय कर्तव्य

काळजाचा तुकडा मृत्यूशी झुंज देतोय आणि तरीही पोलीस बाप बजावतोय कर्तव्य

दत्तात्रेय यांच्या मुलाला मस्क्युलर ऑफ डिस्ट्रॉफी नावाचा आजार झाला आहे. या आधी याच आजारानं त्यांचा छोटा मुलाचाही मृत्यू झाला होता.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 01 मे : राज्यात कोरोना व्हायरस वेगानं वाढत आहे. जवळपास 10 हजारावर रुग्णांची संख्या गेली आहे. या महासंकटाच्या काळात ढाल बनून पोलीस, आरोग्यसेवा 24 तास आपलं कर्तव्य निभावत आहे. असं असतानाही वारंवार पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले, दगडफेक होते. त्यांच्या कुटुंबियांचा आणि त्यांचा या महासंकटात विचार न करता सऱ्हातपणे रस्त्यावर येऊन त्यांच्यावर हल्ला केला जातो.

स्वतःच्या प्राणांपेक्षाही कर्तव्य मोठं मानणाऱ्या असे पोलीस बांधव कोरोनाविरुद्ध लढत आहेत. भर उन्हात मुलाचा कितीही विचार डोक्यात असला तरीही ड्युटी पहिली हे मनात पक्क असल्यानं आपलं कर्तव्य निभावणारे दत्तात्रेय कांबळे हे पोलीस कर्मचारी आहेत. त्यांच्या मुलाला मस्क्युलर ऑफ डिस्ट्रॉफी नावाचा आजार झाला आहे. या आधी याच आजारानं त्यांचा छोटा मुलाचाही मृत्यू झाला होता आणि सध्याच्या स्थितीत मोठा मुलगाही याच आजारासोबत लढतो आहे. अशावेळी मुलासोबत राहणं महत्त्वाचं असतानाही राज्यावर ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी ते आपल्या ड्युटीवर न चुकता उपस्थित राहातात.

हे वाचा-कोरोनावर मोठ्या हिम्मतीनं केली मात, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं

सध्या या आजारावर उपचार नसल्याने त्यांचा लहान मुलाचा मृत्यू झाला आणि त्यातून सावरेपर्यंत या आजारानं मोठ्या मुलाला घेरलं. त्यामुळे आता मोठा मुलागाही मृत्यूशी झुंज देत आहे. या आजारामुळे त्यांचा मुलगा अंथरुणावर आहे. कोरोनाचं महासंकट येण्याआधी साडे चार महिने ICUमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. आता घरातच व्हेंटिलेटरवर ठेऊन त्याची आई काळजी घेत आहे. आपल्या घरावर आणि मुलावर आलेल्या संकटापेक्षा कोरोनाचं संकट दत्तात्रेय कांबळे यांना मोठं वाटत आहे.

नागरिकांकडून होणारे हल्ले ,कोरोनाची लागण झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना गमवावा लागलेला जीव, आणि त्यांचा अशा कौटुंबिक व्यथा, पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अशा किती त्यागाकडे आपण दुर्लक्ष करणार आहोत याचा जरा विचार करायला हवा. कुटुंबीय आणि स्वतःच्या प्राणांपेक्षाही कर्तव्य मोठं मानणाऱ्या अशा पोलीस बांधवांची कोरोना विरोधातील झुंज एकाकी ठरू देऊ नका, या लढ्यात नागरिकांनीही साथ द्यावी अशी भावना व्यक्त केली जात आहे.

हे वाचा-लॉकडाऊनचा दुसरा टप्पाही संपणार, कोरोनाची भारतात काय आहे सद्यस्थिती?

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 1, 2020, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading