मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Coronavirus: राज्यातील निर्बंध कठोर होणार की शिथिलता येणार? अजित पवार म्हणाले....

Coronavirus: राज्यातील निर्बंध कठोर होणार की शिथिलता येणार? अजित पवार म्हणाले....

Ajit Pawar on covid restrictions: राज्यातील काही भागात अद्यापही कोविड बाधितांची संख्या कायम असल्याचं पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत निर्बंध शिथिल करणार की वाढणार असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...

पिंपरी, 21 जुलै : कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus second wave) ओसरत आहे. मात्र, अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यांत विशेषत: पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) आणि कोकणात (Konkan) कोरोना बाधितांची संख्या अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. त्यातच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्यात लागू असलेले निर्बंध आणखी कठोर होणार का? यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हायला हवे. ज्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत अशा नागरिकांना आता घराबाहेर पडण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी द्यायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे. परवा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेल. प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत. काही जणांचे असे मत आहे की, यापुढील 100 ते 120 दिवस महत्त्वाचे आहेत या काळात नियमांचे कठोर पालन व्हायला हवे.

राज्यात कोरोना मृतांच्या आकड्यात नव्यानं 3500 हून अधिकची वाढ, हे आहे त्यामागचं कारण

ग्रामीण भागातील नगर जिल्ह्यातील एका गावात मी गेल्या आठवड्यात गेलो होते. तेथे कुणीही मास्क वापरत नव्हतं. एक बाधित व्यक्ती इतरांना बाधित करु शकते. सर्वांनी फार बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. जी शिथिलता आली आहे ती घालवण्याची आणि अधिक कठोर करण्याची गरज आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.

राज्यात कोरोनाची काय स्थिती ?

20 जुलैच्या आकडेवारीनुसार, राज्यात मंगळवारी 7510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 60,00,911 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट 96.33 टक्के इतका आहे. राज्यात सध्या 94,593 सक्रिय रुग्ण आहेत.

First published:

Tags: Ajit pawar, Coronavirus