Home /News /pune /

पुणेकरांनो सावधान! 'हे' आहेत कोरोनाचे 5 नवे हॉटस्पॉट

पुणेकरांनो सावधान! 'हे' आहेत कोरोनाचे 5 नवे हॉटस्पॉट

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 6 लाख 01 हजार 091 वर पोहोचली आहे.

    पुणे, 26 सप्टेंबर : कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगरपालिके अंतर्गत असलेल्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत चालला आहे. कोरोनाचा धोका दिवसागणित वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. हे 5 वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर माहोल यांनी दिली आहे. सिंहगड रोड, वार्जे-कर्वेनगर, धनकवडी-सहकारनगर, हडपसर-मुढवा, अहमदनगर रोड-वडगाव शेरी या भागांचा त्यामध्ये समावेश आहे. पुण्यात आज नव्यानं 1 हजार 621 लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खऴबळ उडाली आहे. आतापर्यंत पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 951 इतका झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पुणेकरांना एकीकडे यश मिळताना दिसत असलं तरी आता पुण्यातील या 5 भागांमध्ये नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे वाचा-नवी मुंबई पालिकेची हॉस्पिटल्सवर कारवाई, कोरोना परिस्थितीत होते धक्कादायक प्रकार दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे 41 लोकांचा बळी गेल्यामुळे मृतांचा आकडा 3,296 वर पोहोचला आहे. दिवसभरात एकूण 1,256 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आणि सक्रिय रुग्णांची संख्या 17,773 वर पोहोचली. पुण्यात एक दिवसात जवळपास 6 हजार 142 लोकांचे नमुने घेण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 6 लाख 01 हजार 091 वर पोहोचली आहे. हे वाचा-VIDEO: सोशल मीडियानंतर आता मुंबईतील रस्त्यांवर #justiceforsushant चे पोस्टर्स राज्यात काय आहे कोरोनाची स्थिती? राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनानं 459 जणांचा बळी घेतला आहे. तर 19 हजार 164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 82 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आत्तापर्यंत 9 लाख 73 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 74 हजार 996 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात बरे होण्याचं प्रमाण हे 75.86 एवढं झालं आहे. तर मृत्यू दर 2.68 एवढा आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Pune, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या