पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाबद्दल घेण्यात आला मोठा निर्णय

पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाबद्दल घेण्यात आला मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या स्वरूपासंदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.

  • Share this:

पुणे, 21 मे : कोव्हिड-19 या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय आज झालेल्या मानाच्या गणपती मंडळाच्या व्हिडिओ कॉन्फसरींग बैठकीमध्ये घेण्यात आला.

यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपासंदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.

आवाहन

या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल.

सदर बैठकीलाला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे, श्री सौरभ धोकटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष श्री राजाभाऊ टिकार, श्री प्रसाद कुलकर्णी, श्री सौरभ धडफळे, श्री केशव नेउरगांवकर, श्री अनिरुद्ध गाडगीळ, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष श्री प्रविणशेठ परदेशी, श्री राजू परदेशी, श्री पृथ्वीराज परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार श्री विवेक खटावकर, श्री नितीन पंडीत, श्री विकास पवार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री संजीव जावळे, उत्सव प्रमुख श्री पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार श्री संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री सुनिल रासने, कोषाध्यक्ष श्री महेश सुर्यवंशी उपस्थित होते.

संपादन - अक्षय शितोळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2020 03:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading