मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातून आली दिलासादायक बातमी, नवी 27 सॅम्पल निगेटिव्ह

पुण्यातून आली दिलासादायक बातमी, नवी 27 सॅम्पल निगेटिव्ह

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

विमानाने येणाऱ्या प्रवाशांची रोज तपासणी सुरू आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

पुणे, 16 मार्च : पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या 16 एवढीच आहे. नवे 27 सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांची रोज तपासणी सुरू आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

'पुण्यातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. फक्त प्रॉडक्शन युनिटचा प्रश्न असेल. आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत,' असं दीपक म्हैसेकर म्हणाले. तसंच आवश्यकतेनुसार काही भागात कलम 144 लागू केले जाईल. पण संचारबंदी असणार नाही, असंही ते म्हणाले.

पॅनिक करू नका, आयुक्त्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

'पुण्यात काही रिस्ट्रीक्शन नक्की असतील, बंधनं नक्की घातली जातील, त्याचं उल्लंघन झालं तर कारवाई होईल, हे लक्षात घ्यावं. पोलीस आदेश निर्गमित करतील. पुणे सीपींसोबतही बोललो ते ही आदेश निर्गमित करतील. त्याचं पालन करावं,' असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. शहरातली मूव्हमेंट कमी राहावी असा प्रयत्न आहे.

'पॅनिक करू नका, आठवड्याच्या सामानाचा स्टॉक ठीक आहे, दोन दोन महिन्याची शिधा भरण्याची आवश्यकता नाही. दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करू नका,' अशी सूचना कडक शब्दांमध्ये प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मॉल्स, जिम, सिनेमागृह बंद आहेत की नाही ते तपासण्यासाठी पोलिसांची पथकं तपासणी करत आहेत, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.

हेही वाचा-सिद्धीविनायक मंदीर पुढील काही दिवस बंद राहणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. आता खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच, महापालिका आणि ग्रामपंचायता निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

First published:

Tags: Pune news