बापरे! पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच, आजही झाली धक्कादायक वाढ

बापरे! पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच, आजही झाली धक्कादायक वाढ

राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • Share this:

पुणे 28 मे: पुण्यात आजही रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ झालीय. दिवसभरात ३१८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झालीय. तर दिवसभरात २०५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर १० करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. १५० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. त्यामुळे पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ५८५१ वर गेली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या २२९४ झालीय. तर मृत्यूचा आकडा २९३ वर गेला आहे. आजपर्यंतच एकूण ३२६४ जणांना डिस्चार्ज झालाय. आज १३१५ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. त्यामुळे कोरोनाची वाढ रोखायची कशी असा प्रश्न सरकारला पडला आहे.

राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ५४६ पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख १९ हजार ४१७ नमुन्यांपैकी ५९ हजार ५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १२ हजार ७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.

कोरोना विरोधात या 9 औषधांची भारतात केली जातेय चाचणी, काय आहेत त्यांची नावं?

लॉकडाऊन 4.0 संपायला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. केंद्र आणि राज्य स्तरावर आता त्याचा आढावा घेतला जात आहे. 31 मे पर्यंतचा हा लॉकडाऊन संपल्यानंतर आणखी 15 दिवस वाढवला जाऊ शकतो Lockdown 5.0. हा लॉकडाऊन आणखी वेगळ्या स्वरुपाचा असू शकतो. त्यासंदर्भात केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी आज कोरोनाचा प्रकोप असलेल्या महत्त्वाच्या 13 शहरांच्या आयुक्तांशी चर्चा केली.

चिंता वाढली! कोरोना लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनचा विळखा; आत्महत्या करू लागलेत लोक

या नव्या लॉकडाऊनमध्ये जीम आणि मंदिरांना सुट दिली जाऊ शकते. मात्र मॉल्स, शाळा, कॉलेजेस यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही असे संकेत केंद्राने दिली आहेत. गौबा यांनी मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता/हावड़ा, इंदौर, जयपुर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या शहरांच्या आयुक्तांशी चर्चा केली.

प्रतिबंधित क्षेत्रात आणखी कडक उपाय योजना करा अशी सूचनाही राजीव गौबा यांनी केली आहे.

 

First published: May 28, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading